Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 इतर घडामोडी

FCPA पेन्शनधारक संघटनेचे पीएम मोदींना पत्र; ‘महत्त्वाच्या’ 11 प्रमुख मागण्यांसाठी दिले निवेदन!

Xtreme Today   27-11-2026 22:10:34   65214470

FCPA पेन्शनधारक संघटनेचे पीएम मोदींना पत्र; ‘महत्त्वाच्या’ 11 प्रमुख मागण्यांसाठी दिले निवेदन! 

 

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - देशभरातील लाखो पेन्शनधारकांना मोठ्या अपेक्षा आहेत. अशातच ‘फोरम ऑफ सिव्हिल पेन्शनर्स असोसिएशन्स’ (FCPA) या पेन्शनधारकांच्या संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर करत 11 महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. 25 नोव्हेंबर 2026 रोजी सादर करण्यात आलेल्या या निवेदनात जुन्या पेन्शन योजनेची (OPS) पुनर्स्थापना, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये समान सुधारणा, महागाई भत्ता (DA) आणि महागाई दिलासा (DR) यांचे 50 टक्के मूळ वेतन व पेन्शनमध्ये विलिनीकरण अशा महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे.

 

विशेष म्हणजे, 1 जानेवारी 2026 पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही 8व्या वेतन आयोगाच्या पेन्शन सुधारणांचा लाभ मिळावा, अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे. केंद्र सरकारी कर्मचारी, रेल्वे, संरक्षण विभाग, BSNL, MTNL, बँका आणि स्वायत्त संस्थांमधील निवृत्त कर्मचाऱ्यांना समान लाभ मिळावेत, यावरही निवेदनात भर देण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे या संघटनेने 11 मागण्यांवर जोर दिला आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती