Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 वर्ल्ड न्यूज

नव्या संकटाने जगाची चिंता वाढली; इबोलाने हाहाकार उडवला, कांगोमध्ये तब्बल 11 हजार लोकांना लागण! 6 हजार रुग्णांचा मृत्यू!!

Xtreme Today   11-11-2026 20:27:23   536542979

नव्या संकटाने जगाची चिंता वाढली; इबोलाने हाहाकार उडवला, कांगोमध्ये तब्बल 11 हजार लोकांना लागण! 6 हजार रुग्णांचा मृत्यू!!

 

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - कोरोनानंतर आता आणखी एका आजाराने जगाची चिंता वाढवली आहे, या आजारामुळे आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये इबोलाने हाहाकार उडवला आहे. आतापर्यंत कांगोमध्ये तब्बल 11 हजार लोकांना इबोलाची लागण झाली आहे. कांगोच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 11,042 लोकांना इबोलाची लागण झाली असून, ही आतापर्यंतची देशातील सर्वात चिंताजनक स्थिती आहे. या आजारामुळे आतापर्यंत 5,387 लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यांना इबोलाची लागण झाली होती, त्यातील जवळपास 50 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे.

 

कांगोमधील 26 पैकी 8 प्रातांमध्ये इबोलाचा प्रभाव प्रचंड तीव्र गतीने झाला असून, संपूर्ण देशात आणीबाणी सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या मे महिन्यात कांगोमध्ये इबोलाच्या प्रभावाला सुरुवात झाली होती, त्यानंतर इथे इबोलाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, मात्र अजूनही साथ नियंत्रणात आणण्यात यश आलेलं नाहीये. या आजाराचा प्रभाव वाढतच चालला असून, त्यामुळे कांगोच्या शेजारील देशांना देखील धोका निर्माण झाला आहे. धोकादायक म्हणजे अजूनही इबोला या आजारावर कोणताही खात्रीलायक उपचार उपलब्ध नाहीयेत, तसेच हा आजार होऊ नये यासाठी कोणती लसही अजून बाजारात आलेली नाही

 

संयुक्त राष्ट्रसंघाने देखील या आजारावर चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्र संघाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. कांगोमध्ये हा आजार एवढ्या तीव्र गतीने पसरत आहे की, यामुळे आता आफ्रिकेमधील इतर देशांना देखील मोठा धोका निर्माण झाला आहे. याचा मृत्यूदर कोरोनापेक्षा देखील जास्त असल्यामुळे तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे..


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती