2014 मध्ये काँग्रेसचं सरकार त्यांच्या कर्तृत्वाने गेलं; सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रातील मजकुरावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया!
Xtreme Today
11-11-2026 20:24:35
365712440
2014 मध्ये काँग्रेसचं सरकार त्यांच्या कर्तृत्वाने गेलं; सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रातील मजकुरावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया!
नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया यांनी ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव’ पुस्तकात अनेक राजकीय प्रकरणावर पहिल्यांदाच भाष्य केले आहे आणि आपल्या परदेशी असल्याचा मुद्दा आणि पंतप्रधान पद नाकारल्याच्या मुद्याचाही ऊहापोह केला आहे. इंदिरा गांधी यांच्या पश्चात राजीव गांधी यांनी पंतप्रधान पदाला होकार दिल्याने आपण चिडले होतो असेही सोनिया गांधी यांनी पुस्तकात म्हटले आहे. तसेच केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी परदेशी असल्याचा मुद्दा मांडल्याने आपल्याला दु:ख झाले होते, पवार यांच्या वक्तव्यानंतर आपण थेट बैठकीतून बाहेर पडलो असेही सोनियांनी आपल्या आत्मकथनात्मक पुस्तकात म्हटले आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोनिया गांधी यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्या आत्मचरित्रातील मजकुरावर अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी यावेळी सोनिया गांधी यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले की, २०१४ साली काँग्रेसचं सरकार गेलं ते त्यांच्या कर्तृत्वाने गेलं. माझा कोणत्याही पक्षांसोबत संबंध नाही, असंही यावेळी अण्णा हजारेंनी म्हटलं आहे. मी जे काही करतो ते देशहितासाठी आणि समाजाच्या हितासाठी करतो असंही अण्णांनी म्हटलं आहे.
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी लिहिलेल्या Belonging: A Journey of Love या त्यांच्या आत्मचरित्रामध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचाही उल्लेख केलेला आहे. त्यांनी या पुस्तकामध्ये अण्णा हजारे यांनी दिल्लीत केलेल्या आंदोलनाला आरएसएस आणि भाजपचा छुपा पाठिंबा होता, असा आरोप करत अण्णा पुढे कुठेच दिसले नाहीत, असंही म्हटलं आहे. सोबतच अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळे आमचं सरकार गेल्याचं देखील त्यांनी या पुस्तकात म्हटलं आहे. याच मजकुरावर बोलण्यासाठी अण्णा हजारे यांना टीव्ही ९ ने प्रश्न विचारला असता. काँग्रेसचं सरकार हे त्यांच्या कर्तृत्वाने गेलं आहे. त्यामध्ये माझा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही, असं स्पष्टीकरण जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्पष्ट केलं आहे. जबाबदार व्यक्तीने जबाबदारीनेच बोललं पाहिजे, अन्यथा स्वतःची किंमत कमी होते, असा टोला अण्णा हजारे यांनी सोनिया यांना लगवला आहे.
सोनिया यांचं बिलाँगिंग ए जर्नी ऑफ लव्ह हे पुस्तक देशभरात विक्रीसाठी उपलब्ध झालं आहे. सोनिया गांधींनी या पुस्तकात आणीबाणीवरही अनेक दावे केलेत. आणीबाणी लावण्यावरून इंदिरा गांधींवर नेहमीच टीका होते. मात्र, या पुस्तकातून त्यांनी इंदिरा गांधींची पाठराखण करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येतं आहे. आणीबाणी लागू करण्याचा इंदिरा गांधींचा विचार नव्हता, असा दावा सोनिया गांधींनी त्यांच्या या पुस्तकातून केला आहे. आणीबाणी लागू करण्याबाबत त्यांच्या मनात संभ्रम होता. राजीव गांधीही आणीबाणीच्या विरोधात होते. मात्र संजय गांधी हे आणीबाणी लावण्याच्या समर्थनात होते असं त्यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया यांनी ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव’ पुस्तकात अनेक राजकीय प्रकरणावर पहिल्यांदाच भाष्य केले आहे आणि आपल्या परदेशी असल्याचा मुद्दा आणि पंतप्रधान पद नाकारल्याच्या मुद्याचाही ऊहापोह केला आहे. इंदिरा गांधी यांच्या पश्चात राजीव गांधी यांनी पंतप्रधान पदाला होकार दिल्याने आपण चिडले होतो असेही सोनिया गांधी यांनी पुस्तकात म्हटले आहे. तसेच केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी परदेशी असल्याचा मुद्दा मांडल्याने आपल्याला दु:ख झाले होते, पवार यांच्या वक्तव्यानंतर आपण थेट बैठकीतून बाहेर पडलो असेही सोनियांनी आपल्या आत्मकथनात्मक पुस्तकात म्हटले आहे.
मे १९९९ मध्ये बैठकीत शरद पवारांसह काही नेत्यांनी मी परदेशी असल्याचा मुद्दा मांडला. तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि मी बैठकीतून बाहेर पडले. मी पद किंवा सत्तेसाठी राजकारणात आलेली नाही. याच सहकाऱ्यांनी मला राजकारणात यायला सांगितलं होतं. आणि तेच माझ्या विरोधात गेले. या गोष्टीचं दु:ख नाही की मला पद मिळालं नाही. दु:ख याचं आहे की भारताच्या प्रति माझ्या निष्ठेवर प्रश्न उपस्थित केले जात होते. २००४ मध्ये जेव्हा काँग्रेसची सत्ता आली, तेव्हा राहुल आणि प्रियांका यांनी मी पंतप्रधान होण्याला विरोध केला. मुलांनी त्यांच्या आजी आणि वडिलांची हत्या जवळून पाहिली होती. त्यामुळे आईच्या सुरक्षेची त्यांना प्रचंड काळजी होती. त्या रात्री मी अंतरात्म्याचा आवाज ऐकला आणि राहुलच्या खोलीत जाऊन सांगितलं की मी माझा निर्णय घेतला आहे, मी पंतप्रधान होणार नाही. यावर राहुलने मिठी मारुन हा अगदी योग्य निर्णय आहे असे म्हटले असे सोनियांनी या पुस्तकात नमुद केले आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.