Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 नॅशनल न्यूज

नक्षलवादाविरोधातील लढाई सोपी नाही; हे यश देशाच्या योग्य धोरणांचे, दृढ इच्छाशक्तीचे आणि जवानांच्या शौर्य, साहस व संयमाचे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Xtreme Today   08-11-2026 20:21:47   629823154

नक्षलवादाविरोधातील लढाई सोपी नाही; हे यश देशाच्या योग्य धोरणांचे, दृढ इच्छाशक्तीचे आणि जवानांच्या शौर्य, साहस व संयमाचे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

बस्तर (विशेष प्रतिनिधी) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नक्षलवादाविरोधातील लढाई सोपी नसल्याचे नमूद करत, हे यश देशाच्या योग्य धोरणांचे, दृढ इच्छाशक्तीचे आणि जवानांच्या शौर्य, साहस व संयमाचे प्रतीक असल्याचे म्हटले. प्रतिकूल परिस्थितीतही सुरक्षा दल आणि पोलीस दलाचे जवान डटून राहिले, ही त्यांच्या कर्तव्यपरायणतेची जीत आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी सरकारने एकापाठोपाठ अनेक कठोर निर्णय घेतले, ज्यांची आजही अनेकांना माहिती नाही. या निर्णयांनी नक्षलवादी आणि फुटीरतावाद्यांच्या आर्थिक स्रोतांवर मोठा आघात केला.

 

देशात सर्वत्र बनावट नोटांचे जाळे उद्ध्वस्त करून त्यांची आर्थिक कंबर मोडण्यात आली आणि त्यांची संपूर्ण पुरवठा साखळीच थांबवली. यामुळे शस्त्रांचा पुरवठा बंद झाला आणि नक्षलवाद्यांच्या हालचाली व भरतीवर अंकुश लागला. पूर्वीच्या सरकारांनी सुरक्षा दलांचे हात बांधून ठेवले होते, ज्यामुळे त्यांना प्रत्युत्तर देण्याचे स्वातंत्र्य नव्हते. मात्र, आम्ही सुरक्षा दलांना प्रत्येक आवश्यक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले, असे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले. 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमधून देशातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी यावेळी देशातील प्रत्येक जिल्हा नक्षलमुक्त झाल्याचा देखील दावा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगड दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींनी नलक्षग्रस्त भागातील सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी देशातील प्रत्येक जिल्हा नक्षलमुक्त झाल्याची माहिती दिली. आता देशात नक्षलवाद संपून विकास सुरू झाला आहे. त्यामुळे सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी बस्तरच्या जंगलात आलो आहे. सैनिकांसोबत संवाद साधताना नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं की, आज देशाच्या सर्व कानाकोपऱ्यात दिवाळी साजरी केली जात आहे. लोक दूरचा प्रवास करून घरी पोहोचले आहेत. कुटुंब आणि नातेवाईकांची भेट घेण्याचा हा मोठा उत्सव आहे. मी तुमच्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी आलो आहे.   सीमेवर देशाचं रक्षण करणारे वीर जवान तरुण आणि तरुणी माझ्यासाठी प्रिय आहात. तुम्ही माझ्या कुटुंबाचा भाग आहात. कारगिल ते लेपचापर्यंत, समुद्र किनारा ते समुद्रातील आयएनएस विक्रांतपर्यंतच्या जवानांसोबत साजरी केलेली दिवाळी विस्मरणीय राहिलेली आहे. देश नक्षलमुक्त करण्याचं श्रेय हे लाखो जवानांचं आहे. आज मी तुमच्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी आलो आहे. 140 कोटी लोकांच्या वतीने मी तुमचे आभार व्यक्त करण्यासाठी आलो आहे’. असेही ते यावेळी म्हणाले.सरकार आणि व्यवस्थेतील काही घटकांकडून डाव्या विचारसरणीच्या अतिरेक्यांना मिळणारा पाठिंबाही थांबवण्यात आला. कोणताही प्रचार किंवा देखावा न करता, संवेदनशीलतेने काम करत हे मोठे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध होते असे त्यांनी सांगितले. 


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती