Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 इतर घडामोडी

येमेनमध्ये सौदी अरेबियाच्या हवाई हल्ल्यात महिला आणि लहान मुलांसह 33 जणांचा मृत्यू, 39 जण जखमी

Xtreme Today   08-11-2026 20:16:56   168073157

येमेनमध्ये सौदी अरेबियाच्या हवाई हल्ल्यात महिला आणि लहान मुलांसह 33 जणांचा मृत्यू, 39 जण जखमी 

 

येमेन - येमेनमध्ये गेल्या दोन दिवसांत पुन्हा एकदा युद्ध तीव्र झाले आहे. सौदी अरेबियाने मोठा हल्ला चढवला आहे. हवाई हल्ल्यामध्ये महिला आणि लहान मूलं दगावले आहेत. ज्यामध्ये ३३ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. हा भीषण हवाई हल्ला येमेनची राजधानी सनाच्या पूर्वेत स्थीत असलेल्या अल-शरिया या शहरामध्ये झाला आहे.

 

हूती माध्यमांच्या हवाल्याने मिळालेल्या या माहितीनुसार शहरामधील अनेक इमारतींचा चक्काचूर झाला आहे. अनेकांचे मृतदेह मलब्याच्या ढिगाऱ्याखाली दबून आहेत. त्यातील काही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत तर अनेकांचे आणखही काढले जात आहेत. या हल्ल्यामध्ये आतापर्यंत ३९ जण गंभीर जखमी असल्याची माहितीही आहे. अस- मसरिया या वृत्तवाहिनीने हल्ल्यानंतरचे काही व्हिडिओ प्रसारित केलेत. या व्हिडिओंमधून तिथली भीषण परिस्थिती पाहायला मिळत आहे. बचाव पथकांकडून मृतदेह बाहेर काढले जात आहेत. तर जखमींना स्ट्रेचरवरुन रुग्णालयामध्ये हलवले जात असल्याचे या व्हिडिओ क्लिप्समध्ये दिसून येत आहे.

 

दरम्यान, हूती बंडखोरांनी सौदी अरेबियावर येमेनमधील नागरिकांवर हवाई हल्ले केल्याचा आरोप केला याबद्दलचं वृत्त मीडिया संस्था सबाने दिलं आहे. मात्र, सौदीच्या नेतृत्वाखालील लष्करी आघाडीने या आरोपांवर अद्यापपर्यंत कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. हीच लष्करी आघाडी गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ येमेनच्या अधिकृत सरकारला पाठिंबा देत हूती बंडखोरांविरोधात लढत आहे. यमनमधील संघर्ष गेली अनेक वर्ष शांत होता, पण इराण युद्धानंतर हा संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाला. मीडियांमधील प्राप्त माहितीनुसार सौदीने हुथींच्या ताब्यातील सना विमानतळावर हल्ला केलेला. तिथे एका इराणी विमानाला उतरण्यासाठी मज्जाव केला, त्यानंतर दोन्ही बाजूंनी तणाव आणखी शिगेला गेला. त्यानंतर तेहरान समर्थित हुथी बंडखोरांनी सौदी विमानतळाला लक्ष्य केले आणि प्रत्युत्तर दिले. त्यानंतर पुढे लाल समुद्रात सौदीच्या जहाजांवरही हल्ले चढवण्यास सुरुवात केली. या जहाजांचा वापर सौदी हा तेल निर्यातीसाठी (होर्मुझला पर्याय) करतो. त्यामुळे हुथी बंडखोर आणि सौदी- समर्थित सैन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लढाई पुन्हा एकदा सुरु झाली.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती