Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 नॅशनल न्यूज

मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांना मिळणाऱ्या कायदेशीर संरक्षणाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल

Xtreme Today   04-11-2026 20:13:00   273856536

मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांना मिळणाऱ्या कायदेशीर संरक्षणाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल

 

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयुक्तांच्या आजीवन संरक्षणाला आव्हान देण्यात आले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांना मिळणाऱ्या कायदेशीर संरक्षणाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. 

 

या याचिकेमध्ये 2023 सालच्या कायद्यातील कलम 16 च्या घटनात्मक वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. या कलमाअंतर्गत मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांना अधिकृत कर्तव्य बजावताना केलेल्या कृतींसाठी फौजदारी आणि दिवाणी कारवाईपासून देण्यात आलेले आहे. या कलामामुळे निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक आयुक्तांवर कारवाई करता येत नाही. 

 

ही याचिका दाखल झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस जारी केली आहे. या नोटिशीवर आता निवडणूक आयोग तसेच केंद्र सरकारचे उत्तर काय येणार तसेच निवडणूक आयुक्तांवर वेगवेगळे गंभीर आरोप होत असताना दुसरीकडे या याचिकेची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. दरम्यान, निवडणूक आयोग आणि ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधक एकवटले आहेत. काही दिवसांपूर्वी दिल्लीत मोठा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला विरोधी पक्षांचे सर्वच नेते उपस्थित होते. त्याआधी प्रतिसंसद घेऊन विरोधकांनी निवडणूक आयुक्तांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती