Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 इतर घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना त्यांच्या पदावरून तात्काळ हटवा - मल्लिकार्जुन खरगे

Xtreme Today   31-10-2026 19:03:18   125836992

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना त्यांच्या पदावरून तात्काळ हटवा - मल्लिकार्जुन खरगे 

 

 नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - मल्लिकार्जुन खर्गे यांनी मुख्य मल्लिकार्जुन निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना त्यांच्या पदावरून तात्काळ हटवण्याची मागणी केली. काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीच्या घटक पक्षांना बरोबर घेऊन अभिमत संसदेमध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना त्यांच्या पदावरून तात्काळ हटवण्याची ही मागणी केली.

 

 महाराष्ट्रात 40 लाख नवीन मतदार जोडले गेले आहेत. आता मतांची चोरी होत आहे. मतचोरीची अशी शेकडो उदाहरणे आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त अधिनियम, 2023 च्या माध्यमातून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना यात मदत केली जात आहे. 145 विरोधी खासदारांच्या निलंबनानंतर डिसेंबर 2023 मध्ये हे विधेयक मंजूर करण्यात आले. हा कायदा निवडणूक आयुक्तांना आजीवन कायदेशीर संरक्षण देतो, तर भारताचे राष्ट्रपती आणि सरन्यायाधीश यांनाही असे संरक्षण नाही असेही खरगे म्हणाले.

 

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार भूषवले. मुख्य निवडणूक आयुक्तांवरील महाभियोग प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार म्हणाल्या की, लोकांना मतदान करण्यापासून रोखणे हा लोकशाहीवरील हल्ला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार निष्पक्ष नाहीत, असेही त्या म्हणाल्या. यानंतर बोलताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाराष्ट्राचाही उल्लेख केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित सार्वजनिक महाभियोग प्रस्ताव कार्यक्रमादरम्यान केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मुख्य निवडणूक आयोगाविरुद्ध आपल्या मनात कोणताही वैयक्तिक द्वेष नाही, असे त्यांनी सांगितले. त्यांना निष्पक्ष निवडणुका हव्या आहेत, परंतु मुख्य निवडणूक आयोग पंतप्रधानांच्या सांगण्यावरून काम करत आहे, असे ते म्हणाले. आज मतदानाचा हक्क धोक्यात आला आहे, असे काँग्रेस अध्यक्ष म्हणाले.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती