Xtreme Today 30-10-2026 18:41:58 593821465
नरेंद्र मोदी हेच चौथ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार; 2029 ला पुन्हा एकदा एनडीएचे सरकार केंद्रात येणार - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लखनौ (विशेष प्रतिनिधी) - नरेंद्र मोदी हेच 2029 मध्ये देशाचे चौथ्यांदा पंतप्रधान होतीत, अशी घोषणा अमित शाह यांनी केली आहे. उत्तर प्रदेश भाजपाच्या नवर्निवाचित प्रदेश कार्यसमीतीच्या पहिल्या बैठकीमध्ये बोलताना शाह यांनी ही घोषणा केली आहे. या बैठकीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक बडे नेते हजर होते. या बैठकीमध्ये बोलताना नरेंद्र मोदी हेच चौथ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार अशी घोषणा अमित शाह यांच्याकडून करण्यात आली आहे. 2029 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. भाजप सलग तीन टर्मपासून सत्तेत आहे. दरम्यान त्यानंतर आता भाजपकडून आतापासूनच 2029 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची देखील तयार सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. नरेंद्र मोदी हेच 2029 मध्ये देशाचे चौथ्यांदा पंतप्रधान होतीत, अशी घोषणा अमित शाह यांनी केली आहे. उत्तर प्रदेश भाजपाच्या नवर्निवाचित प्रदेश कार्यसमीतीच्या पहिल्या बैठकीमध्ये बोलताना शाह यांनी ही घोषणा केली आहे. या बैठकीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक बडे नेते हजर होते. या बैठकीमध्ये बोलताना नरेंद्र मोदी हेच चौथ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार अशी घोषणा अमित शाह यांच्याकडून करण्यात आली आहे. दरम्यान अमित शाह यांची ही घोषणा म्हणजे भाजपच्या नेत्यांसाठी आणि पक्षातील कार्यकर्त्यांसाठी एक प्रकारे स्पष्ट संदेश असल्याचं बोललं जात आहे. नेत्याने वयाचे 75 वर्ष पूर्ण झाले की सक्रिय राजकारणातून निवृत्ती घ्यावी, असा नियम पक्षात आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वय 76 वर्ष झालं आहे, अशा स्थितीमध्ये जर देशात पुन्हा भाजपची सत्ता आली तर पुढचा पंतप्रधान कोण होणार? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. या सर्व प्रश्नांचं उत्तर केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी या बैठकीमध्ये दिलं आहे. पुढचे पंतप्रधान देखील नरेंद्र मोदी हेच असणार आहेत, ते कुठेही जात नाहीत, असा थेट संदेशच पक्षातील नेत्यांना आता अमित शाह यांनी दिला आहे.