Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 स्पेशल स्टोरी

सोन्याच्या दरात मोठा भूकंप, थेट 38 हजारांनी स्वस्त, गुंतवणूकदारांना चिंता मात्र नागरिक समाधानी!

Xtreme Todayसोन्याच्या दरात मोठा भूकंप, थेट 38 हजारांनी स्वस्त, गुंतवणूकदारांना चिंता मात्र नागरिक समाधानी! मुंबई/जळगांव (विशेष प्रतिनिधी) - गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. सोन्याच्या दरात सुरू असलेल्या घसरणीमुळे ए   26-10-2026 20:53:18   472564199

सोन्याच्या दरात मोठा भूकंप, थेट 38 हजारांनी स्वस्त, गुंतवणूकदारांना चिंता मात्र नागरिक समाधानी!

 

मुंबई/जळगांव (विशेष प्रतिनिधी) -  गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. सोन्याच्या दरात सुरू असलेल्या घसरणीमुळे एकीकडे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे, तर सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान दिसून येत आहे. जळगाव सराफा  बाजारानुसार सध्या 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा जीएसटीसह 1 लाख 46 हजार 260  रुपये एवढे आहेत. तर दुसरीकडे चांदीचे दर प्रति किलो 2 लाख 4 हजार 970 रुपये आहेत.

 

दुसरीकडे दिवाळी आणि त्यानंतर सुरू होणाऱ्या लग्नसराईमध्ये सोन्याच्या दरात वाढ होऊ शकते असा दावा देखील या क्षेत्रातील काही तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र सध्या तरी सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा जो आतापर्यंतचा सर्वोच्च दर होता, त्या दराच्या तुलनेत गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरात तब्बल प्रति तोळा 38,600 रुपयांपेक्षा जास्त घसरण झाली आहे.

 

सर्वसामान्यपणे सोन्याच्या दरावर अंतराष्ट्रीय बाजार, अमेरिकन डॉलरची मजबुती, व्याजदराबद्दल असलेल्या अपेक्षा, कच्च्या तेलाच्या किंमती, अशा विविध घटकांचा परिणाम होत असतो. या सर्व घटकांच्या किमतीमध्ये चढ-उतार झाला तर त्यानुसार सोन्याचे दर देखील कमी जास्त होत असतात. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरूच आहे. सोन्याच्या आतापर्यंतचा जो सर्वोच्च दर होता, त्याच्या तुलनेत गेल्या काही महिन्यात सोनं तब्बल 38 हजार रुपयांनी स्वस्त झालं आहे. एनरीच मनीचे सीइओ पोनमुडी आर यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार MCX वर 1,40,000 प्रति तोळ्याचा सोन्याचा दर हा एक बेस सपोर्ट दर आहे, जर समजा सोन्याचे दर 1,40,000 प्रति तोळ्याच्या वर पोहोचले तर सोन्याच्या दरात मोठी रिकव्हरी होऊ शकते, सोन्याचे दर 1,48,000 ते 1,52,000 रुपयांपर्यंत देखील पोहूच शकतात, परंतु जर हे सोन्याचे दर जर 1,40,000 रुपयांपेक्षा कमी झाले तर ते 1,36,000 ते 1,38,000 रुपये प्रति तोळ्याच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती