Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 इतर घडामोडी

बंगालच्या खाडीत तयार झालेल्या 'अर्णव' चक्रीवादळाची तीव्रता वाढणार; गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट तर भंडारा, गोंदिया, चंद्रपूरला यलो अलर्ट

Xtreme Today   26-10-2026 20:49:43   376422062

बंगालच्या खाडीत तयार झालेल्या 'अर्णव' चक्रीवादळाची तीव्रता वाढणार; गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट तर भंडारा, गोंदिया, चंद्रपूरला यलो अलर्ट 

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - बंगालच्या खाडीत तयार झालेल्या 'अर्णव' चक्रीवादळाची तीव्रता वाढणार आहे. २८ ऑक्टोबर रोजी ते आंध्र प्रदेश किनारपट्टीला धडकणार असून, नंतर विदर्भावरही परिणाम करेल. गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट तर भंडारा, गोंदिया, चंद्रपूरला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे मुसळधार पाऊस आणि ताशी १२० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

 

अर्णव वादळाचं आज मध्यरात्रीपर्यंत भीषण चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. उद्यापर्यंत हे चक्रीवादळ अक्राळविक्राळ रुप धारण करण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या मते 28 ऑक्टोबर रोजी आंध्रपद्रेशाच्या किनारी भागाला या वादळाची धडक बसणार आहे. त्यामुळे हवेची गती प्रति ताशी 120 ते 125 किलोमीटर असणार आहे. वाऱ्याचा हा वेग प्रति ताशी 140 किलोमीटर इतका होण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रालाही या वादळाचा तडाखा बसणार आहे. खासकरून विदर्भात हे वादळ धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

 

हवामान तज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी वादळाचा गंभीर इशारा दिला आहे. पश्चिम बंगलाच्या खाडीत सायक्लोन तयार झाल्यानं मोठ्या प्रमाणात हवेचा जोर राहणार आहे. या सायक्लोनचं नाव अर्णव असं आहे. हे अतिशय अक्राळविक्राळ वादळ आहे. या सायक्लोनचा परिणाम पूर्व विदर्भावर होणार असून गडचिरोलीला याचा सर्वाधिक फटका बसणार असल्याची माहिती प्रवीण कुमार यांनी दिली आहे. गडचिरोलीसोबत भंडारा, गोंदिया, चंद्रपूरवर सुद्धा या वादळाचा परिणाम होणार आहे. 28 आणि 29 तारखेला गडचिरोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर भंडारा, गोंदिया, चंद्रपूरला यलो अलर्ट देण्यात आला आहे. अर्णव वादळ धडकण्याच्या काळात गडचिरोलीमध्ये मुसळधार पावसासह हवेचा जोर ताशी 110 ते 120 पर्यंत असेल. हे वादळ आधी 28 ऑक्टोबर रोजी आंध्रप्रदेशाला धडक देणार आहे. त्यानंतर वादळ गडचिरोलीच्या दिशेने येणार आहे, असा इशाराही प्रवीण कुमार यांनी दिला आहे.

 

ओडिशासाठी 27 ऑक्टोबरची रात्र आणि 28 ऑक्टोबरची सकाळ अत्यंत महत्त्वाची असणार आहे. 27 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी राज्यात किनारी प्रदेशात जोरदार पाऊस होणार आहे. गंजाम, गजपती, रायगडा, कोरापूट आणि मलकानगिरि जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या परिसरात हवेचा वेग ताशी प्रति 90 किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. तर 29 ऑक्टोबर रोजी उत्तर ओडिशाच्या काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो. संबळपूर, सुंदरगड, केंद्रुझर आणि मयुरभंज जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती