Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 स्पेशल स्टोरी

इंटरनेशनल एज्युकेशन समिट २०२७' साठी प्राध्या. डॉ. जयपाल पाटील यांची निवड

Xtreme Today   23-10-2026 20:42:48   18063616

इंटरनेशनल एज्युकेशन समिट २०२७' साठी प्राध्या. डॉ. जयपाल पाटील यांची निवड

 

अलिबाग :- सन २०१५ सालापासून संपूर्ण भारत देशामध्ये अप्रतिम सुरक्षा या विषयावर ७१५ व्याख्याना द्वारे लाखो नागरिकांना सुरक्षिततेचे धडे देणारे, या महत्वाच्या देशसेवेसाठी त्यांना अनेक शासकीय पुरस्कार लाभले आहेत असे प्राध्या. डॉ. जयपाल पाटील यांना शिक्षणाची, जागतिक व्यासपीठाची! इंटरनेशनल एज्युकेशन समिट कडून अभिवादन, व आमंत्रित करण्यात आले आहे.

 

आयोजकांनी पाठवलेल्या ई-मेल मध्ये म्हटले आहे, की २३ जानेवारी २०२७ हो चि मिन्ह, व्हिएतनाम येथे होणाऱ्या संमेलनात आम्हाला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, 'इंटरनेशनल एज्युकेशन समिट २०२७' साठी आपत्तीव्यवस्थापन प्रशिक्षणाबाबत निवड, करण्यात आली असून,हे एक प्रतिष्ठित जागतिक व्यासपीठ आहे, ते शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्टता, नाविन्य आणि नेतृत्वाचा गौरव करण्यासाठी समर्पित आहे.

 

जर तुमची संस्था शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत असेल, तर तुमच्या कामगिरीचे प्रदर्शन करण्याची आणि जगातील आघाडीच्या शाळा व शिक्षण तज्ज्ञांच्या बरोबरीने ओळख मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे. तरी लवकरात लवकर नोंदणी करावी.असे कळविले आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती