राज्यात ऑक्टोबर हीटचा (उष्णतेचा) तडाखा कायम असून, कोकण किनारपट्टीवर उष्णतेची लाट आहे. तसेच देशातील काही राज्यांमध्ये वादळी पावसाचा 'यलो अलर्ट'
Xtreme Today
17-10-2026 20:11:15
148230749
राज्यात ऑक्टोबर हीटचा (उष्णतेचा) तडाखा कायम असून, कोकण किनारपट्टीवर उष्णतेची लाट आहे. तसेच देशातील काही राज्यांमध्ये वादळी पावसाचा 'यलो अलर्ट'
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - देशातील २३ राज्यांमध्ये १८ ऑक्टोबर २०२६ रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ७० ते ७५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
१८ ऑक्टोबर २०२६ रोजी देशात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळू शकतो. उद्या तब्बल २३ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे. ज्यामध्ये यूपी, बिहार हरियाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, जम्मू काश्मीर, झारखंड ओडिशा, पश्चिम बंगाल छत्तीसगढ, मध्यप्रदेश, गुजरात, तेलंगना, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, आसाम, त्रिपूरा, नागालँड आणि महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे. मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ताशी ७० ते ७५ किलोमीटर वेगाने वारे वाहतील. त्यामुळे शेतीपिकांचं नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या ताज्या अंदाजानुसार उद्या १८ ऑक्टोबर रोजी देशामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. देशातल्या २३ राज्यांमध्ये हा इशारा जारी करण्यात आल्यामुळे देशातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. विजांच्या कडकडाटासह वादळी पावसामुळे लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मच्छिमारांना समुद्रकिनाऱ्यांपासून दूर सुरक्षित ठिकाणी निवारा घेण्याचे आवाहनही केले जात आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.