Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 इतर घडामोडी

दिल्ली कोर्टातून अभिजीत दिपकेस काही अटी शर्तींसह जामीन मंजूर; कोर्टातून बाहेर पडतात X वर केली घोषणा!

Xtreme Today   17-10-2026 20:08:11   4572231

दिल्ली कोर्टातून अभिजीत दिपकेस काही अटी शर्तींसह जामीन मंजूर; कोर्टातून बाहेर पडतात X वर केली घोषणा!

 

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - दिल्लीतील कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयाचे आदेश; सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची सुटका केली. मात्र, एक वर्ष शांतता राखण्याच्या बंधपत्राच्या अटींवर सुटकेचे आदेश देण्यात आले आहेत. 

 

 दिल्ली पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत अटक केलेले कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांची सुटका करण्याचे आदेश विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी (SEM) शनिवारी दिले.

 

 

दिपके यांना मंदिर मार्ग पोलीस ठाण्याच्या विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. शुक्रवारी संध्याकाळी ते सीजेपीने नवी दिल्लीतील सेंट्रल पार्क येथे आयोजित केलेल्या ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनात सहभागी होण्यासाठी कॅनॉट प्लेसकडे जात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले होते.

न्यायालयाचा सविस्तर आदेश जारी झाल्यानंतर सुटकेच्या अटी स्पष्ट होतील. दिपके यांची लवकरच सुटका करण्यात येणार असून, त्यांना शांतता राखण्याच्या बंधपत्रातील अटींचे पालन करावे लागणार आहे. या अटींनुसार त्यांना एक वर्ष शांतता राखणे बंधनकारक असेल.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत दिपके यांच्याविरोधात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) मधील कलम 126 आणि 170 अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली होती. त्यांच्यासोबत ताब्यात घेण्यात आलेल्या नेहा बोरा यांची आवश्यक औपचारिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शनिवारीच सुटका करण्यात आली.

 

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 मधील कलम 126 नुसार, शांततेचा भंग किंवा सार्वजनिक अशांतता निर्माण होण्याची शक्यता असलेल्या व्यक्तीविरुद्ध कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा अधिकार आहे.

 

तर कलम 170 नुसार, दखलपात्र गुन्हा घडण्यापासून रोखण्यासाठी पोलीस अधिकारी वॉरंट किंवा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाशिवाय प्रतिबंधात्मक अटक करू शकतात. मात्र, दिपके यांनी बाहेर पडतात एक्स प्लॅटफॉर्मवर एक ट्विट केले आहे. दिपके यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर सौरभ दास आणि आशुतोष रांका या दोघांचा एक फोटो पोस्ट केला आहे. आता मी माझ्या या दोन भावाच्या सुटकेची वाट पाहत आहे, असं ट्विट दिपके यांनी केलं आहे. अभिजीत दिपके यांना काही अटी शर्तींसह जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाची पुढची दिशा नेमकी कशी असणार? याबाबत उत्सकता निर्माण झाली आहे. तसेच सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या सुटकेनंतर कॉकरोच जनता पार्टीकडून आणखी एखाद्या नव्या आंदोलनाची घोषणा होणार का? हे पहाणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

दिल्ली पोलिसांनी दिपके यांना झंडेवालान येथील त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतले होते.

 

शुक्रवारी दुपारी दिल्ली पोलिसांचे २० हून अधिक कर्मचारी दिपके यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. त्यांनी दिपके यांना नोटीस बजावून नागरिक, व्यापारी, प्रवासी, रुग्ण आणि इतरांच्या हक्कांना बाधा पोहोचेल, अशा कोणत्याही कृतीपासून दूर राहण्याचे निर्देश दिले होते. 

 

यापूर्वीही सीजेपीच्या नेते ताब्यात

 

दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन करण्यासाठी राजधानी दिल्लीत दाखल झाल्यानंतर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके आणि पक्षाचे अन्य नेते सौरव दास व आशुतोष रांका यांनाही यापूर्वी विमानातून उतरताच ताब्यात घेण्यात आले होते.

 

त्यानंतर शांतता राखण्याच्या बंधपत्रावर त्यांची सुटका करण्यात आली होती. या बंधपत्रानुसार त्यांना एक वर्ष संबंधित परिसरात शांतता राखण्याचे निर्देश देण्यात आले होते.

 

सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी

 

याच प्रकरणाशी संबंधित घडामोडीत, १३ ऑक्टोबर रोजी जंतरमंतर परिसरात प्रवेश केल्याच्या आरोपावरून सीजेपीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना अलीकडेच पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतले होते.

शांतता राखण्यासाठी यापूर्वी निष्पादित केलेल्या बंधपत्रातील अटींचा कथित भंग केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात पुढील कारवाई करण्यासाठी पुरेशी कारणे असल्याचे नमूद करत विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी त्यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती