Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 इतर घडामोडी

दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे नेते उतरले रस्त्यावर; तर मुंबईत ठाकरेंच्या नेतृत्वात एसआयआर आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध आंदोलन

Xtreme Today   12-10-2026 19:23:29   624639912

दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे नेते उतरले रस्त्यावर; तर मुंबईत ठाकरेंच्या नेतृत्वात एसआयआर आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध आंदोलन 

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे नेते रस्त्यावर उतरले आहेत. दुसरीकडे मुंबईत ठाकरेंच्या नेतृत्वात एसआयआर आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध आंदोलन सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी हे आंदोलन फेक नेरेटीव्ह पसरवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले. भारताचे संविधान नाकारुन या देशात यांना अति डावी सत्ता प्रस्थापित करायची आहे. भारताच्या संविधानाला नाकारण्याचं सर्वात मोठं काम राहुल गांधी आणि इंडिया आघाडीने आज केलं आहे. हे म्हणतात सर्वोच्च न्यायालयावर आम्ही मोर्चा काढू, सरन्यायाधीशांनी आमचं ऐकून घ्यावं अशी अपेक्षाही व्यक्त करतात मात्र, हे कोणत्या संविधानात लिहिलेले आहे की न्यायाधीशांनी यांना भेटावं, ऐकून घ्यावं, असा सवाल मुख्यमंत्र्‍यानी विचारला आहे. दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे नेते रस्त्यावर उतरले आहेत. दुसरीकडे मुंबईत ठाकरेंच्या नेतृत्वात एसआयआर आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध आंदोलन सुरू आहे.

 

काँग्रेस पार्टीने जे सुरू केले आहे, ते पूर्णपणे संविधानविरोधी आहे. संविधान हातात घेऊन संवैधानिक संस्थांना बदनाम केले जात आहे. निवडणूक आयोग, आरबीआय, सीएजी अशा सर्व संस्था कुचकामी असल्याचे दाखवले जात आहे. लोकांना या संस्थांच्या विरोधात चिथावणी देऊन, या संस्था तुम्हाला न्याय देऊ शकत नाही असा नरेटीव्ह निर्माण केला जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. दिल्ली आणि मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्‍यांनी भूमिका मांडत विरोधकांवर टीका केली.

 

सर्वोच्च न्यायालय "सेपरेशन ऑफ पॉवर" प्रमाणे वेगळा आहे. सर्वोच्च न्यायालयाला कोणाशीही चर्चा करता येत नाही, निवेदन स्वीकारता येत नाही. त्यांचा अधिकार तुम्ही दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्याचा आहे. मात्र, जाणीवपूर्वक सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. जे संविधानाचे पाठीराखे म्हणवतात, त्यांनीच सांगावे, सर्वोच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाने एखाद्या मोर्चाला सामोरे जाणं हे भारतीय संविधानाला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत आहे का? असा सवालही मुख्यमंत्री फडणवीसांनी विचारला. सरन्यायाधीशांनी सर्व न्यायाधीशांची चर्चा करुन यांना सांगितले आहे की, आम्हाला तुमच्याशी भेटता येणार नाही. तुम्ही जर याचिका केली तर त्याची सुनावणी आम्ही घेऊ शकू. मात्र, आता सोशल मीडियावर सरन्यायाधीशांविरोधात शिवीगाळ केली जात आहे. एकप्रकारे सर्वोच्च न्यायालय कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका फडणवीसांनी विरोधकांवर केली आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती