Xtreme Today 10-10-2026 19:06:08 389546794
दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद मुंबईत उमटले; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन, दिल्ली पोलिसांच्या कारवाईवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मोदी सरकारवर जोरदार निशाणा मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. मार्स्कवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे. मात्र हे आंदोलन आता चिघळल्याचे दिसून आले आहे. आंदोलनकर्ते आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे मुंबई पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू आहे. यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. तसेच तुषार गांधींनाही ताब्यात घेतले आहे. यानंतर आता आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनी त्यांना सोडवण्यासाठी ठिय्या केला आहे. तर राज ठाकरेंची दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनादरम्यान भलीमोठी पोस्ट केली आहे. या आंदोलनादरम्यान सुरू असलेल्या कारवाईवरून राज ठाकरेंनी मोदी शहा यांना मोठा इशारा दिला आहे. दिल्लीच्या जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन सुरू आहे. परंतु आंदोलनाला परवानागी नसल्याचे कारण देत दिल्ली पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. दिल्ली पोलिसांकडून सीजेपीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलनात माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, अरविंद केजरवील यांनाही कारवाईला सामोरे जावं लागलं आहे. दिल्ली पोलिसांच्या कारवाईवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मोदी सरकार आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हणत राज ठाकरेंनी टीका केली आहे. दिल्लीमध्ये जंतर-मंतरवर आज सीजेपीकडून आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे. सीजेपीचे मुख्य नेते अभिजीत दीपके यांना सहकाऱ्यांसह ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यानंतर दिल्लीमध्येही पोलिसांनी मोठी कारवाई करत अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं. दरम्यान, सीजेपी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर राहुल गांधींनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. भारतातील युवकांचा आपल्याला अभिमान असल्याचं राहुल गांधी यांनी यावेळी म्हटलं आहे. पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज मार्स्कवादी कम्युनिस्ट पार्टी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर आंदोलन करत आहे. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांकडून मुंबई पोलीस मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या जात आहेत. यावेळी आंदोलनात समर्थन देण्यासाठी आलेला बॉलीवूड अभिनेता इम्रान खानलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ऑगस्ट क्रांती मैदानावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या आंदोलनामुळे ऑगस्ट क्रांती मैदानावर अनेक रस्ते बंद करण्यात आले आहे. सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी माकपचं हे आंदोलन सुरू आहे. माकपचे अनेक कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर दुसरीकडे डीएन नगर पोलिसांनी तुषार गांधींनाही ताब्यात घेतले आहे. यानंतर संजय राऊत आणि आदित्य ठाकरे डीएन नगर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले होते. यानंतर तुषार गांधींच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या केला आहे. तुषार गांधींना सोडण्याची कार्यकर्ते मागणी करत आहे. तसेच संजय राऊत आणि आदित्य ठाकरे पोलीस स्टेशनमध्ये बसले आहेत. आंदोलकांना ताब्यात घेऊन गावदेवी पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी ऑगस्ट क्रांती मैदान बॅरिकेड्स लावून बंद केले आहे. काही आंदोलकांना ग्रँट रोडवर ताब्यात घेण्यात आले आहे.