Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 नॅशनल न्यूज

मी दिल्लीला जाणारच! अटक करायची असेल तर करा; अभिजीत दिपकेंचं सरकारला खुलं आव्हान

Xtreme Today   09-10-2026 20:16:20   615873310

मी दिल्लीला जाणारच! अटक करायची असेल तर करा; अभिजीत दिपकेंचं सरकारला खुलं आव्हान

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - दिल्लीत १० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या एका निर्णयामुळे हजारो प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकांवर येणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये बिहार, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांतून दिल्लीत येणाऱ्या प्रमुख गाड्यांचा समावेश आहे. तसेच अनेक मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यात आली आहेत. यावर आता अभिजीत दिपकेंनी प्रतिक्रिया दिली आहे. 

दरम्यान, दिल्लीत उद्या १० ऑक्टोबर रोजी सीजेपीची निदर्शने असल्याने दिल्ली पोलिस अलर्टवर आहेत. यामुळे मेट्रो स्थानक, रेल्वे सेवा आणि रस्तेमार्गावर लावण्यात आलेल्या निर्बंधांवर सुप्रीम कोर्टावर चिंता व्यक्त केली आहे. शुक्रवारी या प्रकरणात झालेल्या सुनावणी दरम्यान मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटले की कायदा – सुव्यवस्था कायम ठेवणे ही सरकारची जबाबदारी आहे, परंतू यात सर्वसामान्य लोकांचे दैनंदिन जीवन संपूर्णपणे बाधित होणार नाही याचीही काळजी घेणे सरकारचे काम आहे. मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत पुढे म्हणाले की काही गोष्टींना रोखावे लागेल. परंतू कारवाई तेवढीच करा जेवढी गरजेची आहे. परंतू याचा अर्थ असा नाही की तुम्ही माशी मारण्यासाठी हातोडीचा वापर कराल, या गोष्टींची काळजी घ्या असेही कोर्टाने म्हटले आहे.

 

अभिजीत दिपके म्हणाले की, हा देश भाजपचा झालेला आहे. देशातील सर्व संस्था भाजपच्या झाल्या आहेत. यामुळे ते कुणाचे ऐकायला तयार नाहीत. तुम्ही रेल्वे मेट्रो सेवा कशी बंद करू शकता? आता ते लोक विमानांच्या प्रवाशांची यादी मागत आहेत. सरकार देशातील तरुणांना घाबरलेलं आहे. हे डरपोक सरकार आहे. मला अटक करा, मला अटक केल्याने देशाच्या अडचणी दूर होणार असतील तर मला अटक करा. मी दिल्लीला जाणार आहे. जर मला अटक करायचे असेल तर करा. तरुणांची एवढी भीती वाटते तर देश बंद करा, असं म्हणत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

 

ते पुढे म्हणाले की, मी दिल्लीला जाणार आहे. मला अटक करायची तर करा. मी इथेच आहे मुंबईत किंवा दिल्लीत. अटक करायची असेल तर करा. देशाच्या तानाशाहांना सांगा का असे करत आहात? नरेंद्र मोदींच्या डोक्यात तानाशाही घुसली आहे. हे सरकार घाबरलेले आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती