सीनियर जर्नालिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाच्या ज्येष्ठ पत्रकार संघात सामिल व्हावे, आणि त्यांच्या माध्यमातून कल्याण करा - प्राध्या. डॉ. जयपाल पाटील
Xtreme Today
03-10-2026 22:14:28
22735913
सीनियर जर्नालिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाच्या ज्येष्ठ पत्रकार संघात सामिल व्हावे, आणि त्यांच्या माध्यमातून स्वतःचे कल्याण करा - प्राध्या. डॉ. जयपाल पाटील

मुंबई - महाराष्ट्रातील सीनिअर जानॉलिस्ट असोसिएशन या ज्येष्ठ पत्रकारांची संघटना ही पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचाऱ्यांची देशस्तरावर कार्य करणारी संघटना आहे. ज्येष्ठ पत्रकार व संपादक डॉ. राम अग्रवाल आणि श्री.संजयकुमार जोशी, या दोघांनी मिळून धर्मादाय आयुक्त पुणे यांच्याकडे रीतसर नोंदणी क्रमांक 144/ 2023 यावर्षी केली आहे.
यावर्षी जानेवारी 2026 पासून या संघटनेचे कार्य वेगाने सुरू झाले आहे. या संघटनेत सामील होऊन आपले व आपल्या कुटुंबाचे कल्याण करावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष प्राध्या. डॉ. जयपाल पाटील यांनी केले आहे. देश स्तरावर महाराष्ट्रासोबतच गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, हरियाणा, पंजाब, राजस्थान, तमिळनाडू, कर्नाटक, ओडिशा, बिहार, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, गोवा आदी राज्यात आपल्या संघटनेचे कार्य चालू आहे. त्या त्या राज्यातील ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि पत्रकारेतर कर्मचाऱ्यांचा सन्माननीय सभासद व पदाधिकारी म्हणून चांगला प्रतिसाद लाभला आहे. हे विशेष. येत्या काळात पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर आदी राज्यातही विस्तार कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे.
महाराष्ट्रात पुणे आणि मुंबई सहित पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र या विभागात सभासद नोंदणी आणि पदाधिकारी नियुक्ती कार्य वेगाने सुरू आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात येत्या काळात विस्तारित कार्य हाती घेण्यात येत आहे. यासाठी आपले सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
सीनियर जर्नालिस्ट असोसिएशन'चा उद्देश आणि कार्य :
वृत्तपत्र माध्यम आणि ऑनलाईन डिजिटल मीडिया यांच्याशी संबंधित अनेक ज्येष्ठ पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचारी त्यांच्या नियुक्तीपासूनच ते दुर्लक्षित केले जाते, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. अत्यंत प्रामाणिक आणि निष्ठापूर्वक कार्य करणारे, देशस्तरावर लाखो कर्मचारी दुर्लक्षित आहेत. नोकरी काळातील तुटपुंजे वेतन, अनिश्चितता व असुरक्षितता , अपूरे वेतन कुटुंबाच्या तरतुदीसाठी घेतलेले कर्ज व त्याचे थकलेले हप्ते आणि पदोपदी होणारा अपमान असे गंभीर चित्र दिसते. या परिस्थितीमुळे निवृत्तीनंतर त्यांचे वर्तमान आणि भविष्यकाळ अंधकारमय आहे. कोणतीही आर्थिक मदत किंवा हातभार त्या-त्या आस्थापनाकडून किंवा सरकारकडून त्यांना मिळत नसल्याने कुटुंबात त्यांची दुरावस्था दिसून येते. त्यामुळे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतीत त्यांना जीवन जगावे लागत आहे, हे माध्यम कर्मचाऱ्यांच्या, संपादकांच्या, पत्रकारांच्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. या सर्व अनुभवातून महाराष्ट्रातील१५ ते१७ ज्येष्ठ पत्रकारांनी भारताच्या राष्ट्रपती महोदया महामहीम श्रीमती द्रोपदी मुर्मु यांच्याकडे स्वेच्छा मरण्याचा अर्जही दिला आहे, हे अतिशय महाराष्ट्राला लांचनास्पद आहे, या सर्व प्रश्नांचा अभ्यास करूनच 'सीनियर जर्नालिस्ट असोसिएशन' ही देशव्यापी संघटना कार्य करणार आहे.
महाराष्ट्र राज्याचा विचार केल्यास अनेक जिल्ह्यातील मुद्रित आणि ऑनलाइन डिजिटल मीडिया माध्यमाशी संबंधित अनेक कर्मचारी, पत्रकार आणि संपादक यांची दयनीय अवस्था आहे.
अभ्यासाअंती आणि सर्वेक्षणानंतर प्रत्येक जिल्ह्याचे प्रश्न अनेक असले तरी एकच महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पत्रकारांचा आर्थिक प्रश्न. त्यामुळे आम्ही 'सीनियर जर्नालिस्ट असोसिएशन'च्या माध्यमातून खालील महत्त्वाच्या मुद्द्यांवर कार्य हाती घेतले आहे.
१) देश स्तरावर व राज्यस्तरावर संपादक, पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचाऱ्यांची बांधणी करणे, त्यांची एकजूट करणे.2)केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून अधिस्वीकृती पत्र व या अनुषंगाने मिळणाऱ्या सुविधा उदाहरणार्थ बस - रेल्वे पासेस व इतर सुविधा उपलब्ध करून देणे.३) या कर्मचाऱ्यांच्या आरोग्य, उपचार संबंधित प्रश्नावर कार्य करणे. गंभीर (Critical illness) आजारासाठी त्यांना स्वतःला आणि त्याच्या पत्नीला आर्थिक तरतूद उपलब्ध करणे अथवा मिळवून देणे. विद्यमान परिस्थितीत 'सीनियर जर्नालिस्ट असोसिएशन' सभासदासाठी गंभीर (Critical illness) आजारासाठी वार्षिक .₹.10 लाख (अक्षरी रुपये दहा लाख) तरतूद काही धर्मादाय संस्था यांच्या मदतीने केली आहे.
4) लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्रपणे केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून आर्थिक कल्याण मंडळाची संवैधानिक पद्धतीने स्थापना करण्यासाठी पाठपुरावा करून कसोशीने प्रयत्न करणे. केंद्र अथवा राज्य सरकारच्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांसाठी कल्याण निधीची तरतूद करणे. तसेच साखळी वृत्तपत्र वगळता इतर सोशल मीडिया पत्रकारांसाठी व त्यांच्या डिजिटल पोर्टल युट्युब व तत्सम करिता केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून जाहिरातीच्या माध्यमातून तसेच इतर उपक्रम व स्रोत राबविण्याचे प्रयत्न सुरु करुन त्यांच्यासाठी आर्थिक तरतूद उभी करणे व त्यासाठी पाठपुरावा करणे.
5) अधिक निष्ठापूर्वक, प्रामाणिकपणे, वैविध्यपूर्ण इ. कार्य केलेल्या कर्मचाऱ्यांची पात्रता तपासणे व त्यांना जिल्हा, विभाग, राज्य व देश पातळीवर सन्मानित करणे, सन्मानचिन्ह आणि आर्थिक सहकार्य, मदत संघटनेच्या इतर संस्थांच्या अथवा राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून करणे.
6) 'सीनियर जर्नालिस्ट असोसिएशन'च्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीय किंवा पाल्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान, सोशल डिजिटल मीडिया माध्यमातून उदा. पोर्टल, youtube, वेब पेज, Ai आदि विषयावर कार्यशाळा अधिवेशन व प्रशिक्षण संस्थांची उभारणी करणे. या कामे जिल्हा, विभाग, राज्य व देश पातळीवर असणाऱ्या तज्ञांची अथवा संस्थांची मदत व सहकार्य घेणे आणि ते कार्यरत करणे. श्रेष्ठ पत्रकारांच्या पाल्यांना आर्थिक उन्नतीसाठी उद्योग व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन, उद्योग धंदा काढण्यास मदत करणे,
7) सभासद होण्यासाठी पात्रता : वय वर्ष 55 असलेल्या निवृत्ती किंवा कार्यरत असलेल्या किंवा 12 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ माध्यमात कार्य करीत असलेल्या किंवा निवृत्त झालेल्या व्यक्तींना, पत्रकार आणि पत्रकारेतर कोणत्याही व्यक्तीस सभासद होता येते. भाषा, लिंगभेद, जाती - जमाती यांचा कोणताही अडथळा न ठेवता तसेच मुद्रित अथवा डिजिटल स्वरूपाच्या माध्यमांतील सर्वांना आपल्या संघटनेचे सभासद होता येईल. सभासद नोंदणी आणि शुल्क म्हणून महाराष्ट्र राज्यासाठी यावर्षी रु. 1000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्त) आणि इतर राज्यासाठी रुपये 1500/- (अक्षरी रुपये एक हजार पाचशे) फक्त आहे. शुल्क फक्त ऑनलाईन फोन पे किंवा गुगल पे द्वारेच संस्थेच्या भारत सरकारच्या पोस्ट खात्याच्या अकाउंट मधे स्विकारले जाईल . कोणत्याही कारणाने सभासद पद रद्द केल्यास किंवा विश्वस्तांच्या निर्णयाप्रमाणे रद्द झाल्यास शुल्क परत केले जात नाही.
8)इतर अनुषंगिक परिस्थितीत पदाधिकारी अथवा सभासदांच्या उन्नतीसाठी, सहकार्यासाठी वेळोवेळी अभ्यास व संशोधन करून बदल करणे आवश्यक असेल तर त्याचा निर्णय विश्वस्त पातळीवर घेतला जाईल. तो निर्णय संघटनेच्या जिल्हा, विभाग, राज्य व देश पातळीवर सर्वांना बंधनकारक राहील.
डॉ. जयपाल पाटील,
विश्वस्थ व अध्यक्ष
मो. 9270646777/9405437287
श्री. संजय कुमार जोशी
संस्थापक विश्वस्थ व सरचिटणीस
मो. 9307895379
श्री. मिलिंद वैद्य
विश्वस्थ व उपाध्यक्ष, अध्यक्ष पुणे जिल्हा
श्री. चंद्रकांत कांबळे
विश्वस्थ व कोषाध्यक्ष, सचिव पुणे जिल्हा
डॉ. राम अग्रवाल
संस्थापक व माजी अध्यक्ष विश्वस्त,
*सीनियर जर्नलिस्ट असोसिएशन,*
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.