Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 नॅशनल न्यूज

मुंबईत सीजेपीच्या वतीने निवडणूक आयोगा विरोधात आंदोलन; अभिजीत दिपके यांच्या या आंदोलनाला विरोध करण्यासाठी मात्र जेन नेक्स्ट रस्त्यावर!

Xtreme Today   02-10-2026 18:00:15   467328817

मुंबईत सीजेपीच्या वतीने निवडणूक आयोगा विरोधात आंदोलन; अभिजीत दिपके यांच्या या आंदोलनाला विरोध करण्यासाठी मात्र जेन नेक्स्ट रस्त्यावर!

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) -  मुंबईत सीजेपीच्या वतीने निवडणूक आयोगा विरोधात आंदोलनाला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे आता अभिजीत दिपके यांच्या या आंदोलनाला विरोध करण्यासाठी जेन नेक्स्ट रस्त्यावर उतरल्याची पहायला मिळत आहे.

निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत 20 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘विशेष सखोल पुनरावलोकन’ ( SIR) मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत कोट्यवधी मतदार वेगवेगळ्या कारणांमुळे मतदान यादीमधून वगळण्यात आले आहेत. त्यामुळे आता विरोधी पक्षांकडून निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर विरोधकांनी गंभीर आरोप केले आहेत. याविरोधात येत्या 6 ऑक्टोबर रोजी विरोधी पक्षांकडून दिल्लीतील मुख्य निवडणूक कार्यालयावर मोठा मोर्चा देखील काढण्यात येणार आहे. तर दुसरीकडे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी (CJP) कॉकोरच जनता पार्टीच्या वतीने आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे.

 

मात्र, अभिजीत दिपके यांच्या या आंदोलनाला विरोध करण्यासाठी जेन नेक्स्ट रस्त्यावर उतरल्याची पहायला मिळत आहे. देशभरात सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेवरून विरोधी पक्षांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर अभिजीत दिपके संस्थापक असलेल्या कॉकरोच जनता पार्टीकडून देखील या प्रकरणात आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. सीजेपीकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण एसआयआर प्रक्रिया रद्द करावी, 2029 मध्ये होणारी निवडणूक ही 2025 च्या मतदार यादी प्रमाणेच घ्यावी अशा देखील काही मागण्या सीजेपीच्या वतीने करण्यात आल्या आहेत. 

 

आपल्या या विविध मागण्यांसाठी मुंबईतील शिवाजी पार्क येथे सीजेपीच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं जेन झी तरुण सहभागी झाले आहेत. मात्र दुसरीकडे आता अभिजीत दिपके यांच्या या आंदोलनाला विरोध करण्यासाठी जेन नेक्स्ट रस्त्यावर उतरल्याचं दिसून येत आहे. जेन नेक्स्टकडून मंत्रालय परिसरामध्ये आंदोलनाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता एकाचवेळी दोन आंदोलन सुरू झाल्यामुळे मुंबईतील वातावरण चांगलंच तापलं आहे. 

 

दरम्यान, सीजेपी कॉकरोच जनता पार्टी राजकारण करत आहे. आम्ही संविधान माणनारे लोक आहोत. मात्र दिपके आणि त्यांची गँग संविधान मानत नाही. म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांच्या आंदोलनाचा विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरलो आहोत, असं यावेळी जेन नेक्स्ट आंदोलकांनी म्हटलं आहे. तर आम्ही ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यावर ठाम आहोत. जोपर्यंत राजीनामा होत नाही, तोपर्यंत आमचं आदोंलन सुरूच राहिलं, आम्ही देशाच्या विविध भागात आंदोलन करू, त्यानंतर दिल्लीमधील जतंर -मतंरवर आंदोलन करू असा इशारा मुंबईतील आंदोलनापूर्वीच अभिजीत दिपके यांच्याकडून देण्यात आला आहे. आज मुंबईमध्ये सीजेपीच्या वतीने आंदोलनाला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे त्यांच्या या आंदोलनाला विरोध देखील होत  आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती