कॅप्टन स्मित मच्छार यांना अशोक चक्र द्या, महाराष्ट्रातून मागणी; थेट पंतप्रधानांना पत्र
Xtreme Today
02-10-2026 17:54:38
157032927
कॅप्टन स्मित मच्छार यांना अशोक चक्र द्या, महाराष्ट्रातून मागणी; थेट पंतप्रधानांना पत्र
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून १८० विमान प्रवाशांचे जीव वाचविण्याऱ्या पायलट कॅप्टन स्मित माछर यांचे कौतुक करण्यात आले.
स्वतःवर प्राणघातक हल्ला झाला असतानाही फ्लाय दुबई विमानाचे पायलट कॅप्टन स्मित माछर यांनी प्रसंगावधान राखून धीरोदात्तपणे विमानातील १८० प्रवाशांचे प्राण वाचवले. या असाधारण आणि प्राणांची बाजी लावणाऱ्या धैर्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकर कॅप्टन स्मित यांचा खरा हिरो असा उल्लेख करत, त्यांचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र सुपुत्र कॅप्टन स्मित तमाम भारतीयांसाठी सार्थ अभिमान ठरल्याचे कौतुकोद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले आहेत.
‘मुंबईचा सुपुत्र आणि खरा ‘हिरो’ कॅप्टन स्मित यांच्याबद्दल मला अभिमान वाटतो. स्मित यांनी अत्यंत असाधारण आणि विलक्षण पद्धतीने शेकडो लोकांचे प्राण वाचवले! गंभीर दुखापतीतही स्मित यांनी दाखवलेली प्रसंगावधानता आणि धैर्य खरोखरच अनुकरणीय आहे. कठीण प्रसंगात प्रवाशांनीही एका टीमप्रमाणे तत्परतेने काम केलं, त्यांनाही सलाम. स्मित लवकर बरे व्हावे आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभो, अशी कामना करतो! आपण युवकांसाठी प्रेरणास्थान आहात. महाराष्ट्र आणि देशाला आपला अभिमान वाटतो, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन संदेशात म्हटले आहे.
मुंबई (विशेष प्रतिनिधी)- फ्लाईदुबईचे कॅप्टन स्मित मच्छार यांनी विमान दुर्घटनेत दाखवलेल्या अतुलनीय शौर्यामुळे १७४ प्रवाशांचे प्राण वाचले. कॉकपिटमध्ये हल्ला होऊन गंभीर जखमी होऊनही त्यांनी परिस्थिती कुशलतेने हाताळली. या अतुलनीय कार्याबद्दल त्यांना 'अशोक चक्र' प्रदान करावे, अशी मागणी खासदार मिलिंद देवरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून केली आहे.
फ्लाईदुबईचे कॅप्टन स्मित मच्छार यांना अशोक चक्र सन्मानाने गौरवण्यात यावं, अशी मागणी शिंदे गटाचे नेते आणि राज्यसभा सदस्य मिलिंद देवरा यांनी केली आहे. मिलिंद देवरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे. मी कॅप्टन स्मित मच्छार यांच्याबाबत लिहित आहे. ते मुंबईत जन्मलेले पायलट आहेत. दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लाईदुबईमध्ये झालेल्या घटनेवेळी त्यांनी असाधारण हिंमत आणि प्रसंगावधान दाखवलं. त्यामुळे विमानातील सर्वच्या सर्व 174 प्रवाशांचा जीव वाचला, असं या पत्रात देवरा यांनी लिहिलं आहे.
स्मित यांच्या या शौर्याचं केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात कौतुक होत आहे. माझा असा विश्वास आहे की, अशा कार्याला औपचारिक मान्यता देण्याचे महत्त्व एखाद्या एका व्यक्तीला सन्मान देण्यापेक्षा कितीतरी अधिक आहे. यामुळे एक मजबूत संदेश जाईल. विशेषतः तरुणांमध्ये हा संदेश जाईल. त्यांचे धैर्य केवळ युद्धभूमीवर किंवा एखाद्या विशिष्ट व्यवसायापुरते मर्यादित नाही, असं मिलिंद देवरा यांनी या पत्रात नमूद केलं आहे. गंभीर जखमी असातनाही मच्छार यांनी विमानातील सर्वच्या सर्व 174 प्रवाशांच्या सुरक्षेसाठी त्यांचं काम चालू ठेवलं. यावेळी या 174 प्रवाशांमध्ये 27 मुलंही होती. त्यांनी या फ्लाइटमधून वेगाने एमर्जन्सी सिग्नल पाठवले. वेगाने परिस्थिती हाताळली. त्यानंतर विमानाला सौदी अरबच्या तबुकमध्ये प्रिन्स सुल्तान बिन अब्दुल अजीज एअरपोर्टवर नेण्यात आलं, असं या पत्रात म्हटलं आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.