Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 नॅशनल न्यूज

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला मोठा दिलासा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, कृषीमंत्री चौहान ॲक्शन मोडमध्ये

Xtreme Today   28-09-2026 19:08:32   776251905

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला मोठा दिलासा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, कृषीमंत्री चौहान ॲक्शन मोडमध्ये

 

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - दोनच दिवसांपूर्वी राज्य सरकारने महाराष्ट्रात कोरड्या दुष्काळाची घोषणा केली आहे. त्यानंतर आता राज्यातील दुष्काळाची दखल केंद्र सरकारने देखील घेतली असून, केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान हे ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे. एल निनोचे संकट फक्त याच वर्षी आहे असे अजिबात नाही. पुढच्या वर्षीही एल निनोचा प्रभाव आगामी काळात आणखी वाढण्याची अंदाज आहे. त्यामुळे आतापासूनच पाण्याचे दुर्भिक्ष जाणून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. पुढच्या वर्षीच्या पावसावर त्याचा परिणाम होऊ शकतो. याचेच गांभीर्य ओळखून राज्य सरकारने 2027 पर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी महत्वाची पाऊस उचलण्याचा निर्णय घेतला.

 

पावसाभावी पिकं वाळून गेले आहेत. राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात आहे. या पार्श्वभूमीवर दोनच दिवसांपूर्वी राज्य सरकारने महाराष्ट्रात कोरड्या दुष्काळाची घोषणा केली आहे. त्यानंतर आता राज्यातील दुष्काळाची दखल केंद्र सरकारने देखील घेतली असून, केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान हे ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे.

 

दरम्यान, देशात एल- निनोचे संकट शेतीला मोठा फटका देणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यंदाचे हवामान शेतकऱ्यांची परीक्षा पाहणारे ठरणार आहे. एल-निनोने रब्बी पिकांची चिंता वाढविली आहे. जेथे सिंचनाच्या ऐवजी पावसाच्या भरोसे शेती होते तेथे रब्बी सिझन अडचणी तयार करु शकतो असे कृषी सचिव अतिश चंद्र यांनी म्हटले आहे. जर पावसाची गणित बिघडले तर गहू, राई, डाळ आणि तिळाचे उत्पादनावर परिणाम होणार असल्याने खाद्य तेलावर देखील संकट येऊ शकते.  रब्बी सिझनमध्ये पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांवर मोठा परिणाम होणार आहे. शेतकऱ्यांनी  पेरण्या केल्या आणि पाऊसच आला नाही तर पिके अडचणीत येतील. देशात खास करुन उत्तरेत रब्बी पिकांची पेरणी ऑक्टोबर पासून सुरु होते. गहू आणि राईची यात महत्वाची पिके आहे. या शेतीला योग्यवेळी आवश्यक आद्रता गरजेची असते. खासकरुन पावसावर अवलंबून असलेले शेतकरी हवामानावर विसंबून असतात. अशात पाऊस कमी झाला तर शेतातील आद्रता कमी किंवा जास्त झाली. किंवा शेतात आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी जमले तरीही दोन्हीही गोष्टी पिकांसाठी संकट बनू शकतात.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती