Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 नॅशनल न्यूज

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना महाराष्ट्रातून पहिलं कायदेशीर आव्हान; काही निर्णय आणि प्रशासकीय प्रक्रियांना आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात दाखल

Xtreme Today   25-09-2026 22:03:11   213682617

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना महाराष्ट्रातून पहिलं कायदेशीर आव्हान; काही निर्णय आणि प्रशासकीय प्रक्रियांना आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात दाखल

 

कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी) - मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना महाराष्ट्रातून पहिलं कायदेशीर आव्हान देण्यात आलं आहे. काही निर्णय आणि प्रशासकीय प्रक्रियांना आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.

 

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या काही निर्णय आणि प्रशासकीय प्रक्रियांना आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. प्रथमेश गोपाल गवाणकर, गौरव सूर्यकांत नाखरेकर, आदेश शशिकांत भाटकर आणि स्मिताली निलेश नार्वेकर यांनी ही याचिका दाखल केली आहे.

 

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या काही निर्णय आणि प्रशासकीय प्रक्रियांना आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. प्रथमेश गोपाल गवाणकर, गौरव सूर्यकांत नाखरेकर, आदेश शशिकांत भाटकर आणि स्मिताली निलेश नार्वेकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. असीम सरोदे यांच्यासह वकिलांचे पथक काम पाहत आहे.

 

याचिकेतील महत्त्वाचे मुद्दे काय?

1. निवडणूक आयोगाच्या दोन आयुक्तांनी विविध निर्णय आणि प्रक्रियांबाबत १४ वेळा आक्षेप नोंदविल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

 

2. मतदार नोंदणी, मतदारांची नावे वगळणे, मतदार यादीचा डेटाबेस, ERO कार्यपद्धती आणि ECINet प्रणालीशी संबंधित मुद्दे याचिकेत उपस्थित करण्यात आले आहेत.

 

3. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त कायदा, २०२३ अंतर्गत निवडणूक आयोगाचे निर्णय सामूहिक पद्धतीने घेतले गेले का? असा कायदेशीर प्रश्नही याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे.

 

4. तसेच महाराष्ट्रातील SIR प्रक्रिया थांबवावी, SIR दरम्यान मतदार यादीतून वगळण्यात आलेली नावे पुनर्स्थापित करावीत

 

5. कथित अनियमिततेची चौकशी करण्यासाठी निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र न्यायिक समिती स्थापन करावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

 

देशातील निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवरून आणि ज्ञानेश कुमार यांच्या कारभारावरून विरोधकांनी रान उठवले आहे. दोन सहकारी आयुक्तांनी ज्या तक्रारी केल्याचा दावा द इंडियन एक्सप्रेसने त्यांच्या वृत्तात केला आहे. त्या आधारे विरोधक आक्रमक झाले आहेत. गेल्या दोन ते तीन वर्षातील निवडणुका निष्पक्ष झाला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. या निवडणुका रद्द कराव्यात आणि नव्याने निवडणूक घेण्याची मागणी विरोधी पक्षनेते करताना दिसत आहेत. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात येत आहे. तर सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी येत्या 48 तासात मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा न दिल्यास देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यातच आता आयुक्तांविरोधात कायदेशीर लढा सुरू झाल्याचे कोल्हापूर खंडपीठातील याचिकेवरून समोर येत आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती