Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 नॅशनल न्यूज

एल निनोनंतर आता देशावर सर्वात मोठं संकट, IMD चा थेट रेड अलर्ट; पुढचे 36 तास अत्यंत धोक्याचे

Xtreme Today   22-09-2026 20:10:43   573694389

एल निनोनंतर आता देशावर सर्वात मोठं संकट, IMD चा थेट रेड अलर्ट; पुढचे 36 तास अत्यंत धोक्याचे

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - बंगालच्या उपसागरात एक हवामान प्रणाली तयार झाली आहे. ही हवामान प्रणाली प्रचंड वेगाने पश्चिम-उत्तर दिशेकडे सरकत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) ने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या या हवामान प्रणालीचं रुपांतर पुढील 12 तासांमध्य प्रचंड दाबाच्या क्षेत्रात होणार आहे. मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास बंगालच्या उपसागरात ही हवामान प्रणाली तयार झाली आहे.

 

यंदा देशभरात एल निनोचं सावट आहे. एल निनोचा महाराष्ट्रालाही मोठा फटका बसला आहे. जुनच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलै मध्ये राज्यात मुसळधार पाऊस झाला. परंतु ऑगस्ट महिन्यात पावसात जो खंड पडला आहे, तो अजूनही राज्यात समाधानकारक पाऊस झालेला नाहीये. राज्यात दुष्काळ पडला आहे. खरीप पिके हातची गेली आहेत. एकीकडे हे सर्व सुरू असतानाच आता दुसरीकडे देशावर एक मोठं संकट घोंघावत आहे. हवामान विभागाकडून या पार्श्वभूमीवर रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 36 तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत.

 

या वादळाचा वेग आता वाढला असून, प्रति तास 18 किलोमीटर वेगाने हे वारं पश्चिम दिशेकडे सरकत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार ही हवामान प्रणाली सध्या गोपालपूरपासून 200 किलोमीटर, आंध्रप्रदेशच्या कलिंगपट्टनमपासून 200 किलोमीटर पुरीपासून 210 किलोमीटर अंतरावर आहे. पुढील 12 तासांमध्ये ही हवामान प्रणाली रौद्र रूप धारण करण्याची शक्यता आहे. गुरुवारी हे वादळ विशाखापट्टनम आणि गोपालपूरदरम्यान उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाचा समुद्र किनारा पार करण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांमध्ये श्रीकाकुलम, विजयनगरम,पार्वतीपुरम आणि अल्लूरी सीताराम राजू या भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या या हवामान प्रणालीचं रूपांत मोठ्या चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचं नामकरण ‘अर्णब’ असं ठेवलं जाणार आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून आंध्र प्रदेश आणि ओडिशाला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक भागांमध्ये या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.  या हवामान प्रणालीचं रूपांतर जर चक्रीवादळात झालं तर मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती