Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 स्पेशल स्टोरी

सोन्यात दरवाढीचा स्फोट होणार? Gold Rate सगळे रेकॉर्ड मोडणार, 3 लाख तोळा होईल, जेफरीजच्या एक्सपर्टचा अंदाज

Xtreme Today   17-09-2026 19:51:06   725975504

सोन्यात दरवाढीचा स्फोट होणार? Gold Rate सगळे रेकॉर्ड मोडणार, 3 लाख तोळा होईल, जेफरीजच्या एक्सपर्टचा अंदाज

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - भारतात 10 ग्रॅम सोन्याची किंमत तीन लाख रुपयांवर उसळी घेऊ शकते. सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही बाब चिंतेची आहे, पण गुंतवणूकदारांच्या कामाची ठरू शकते. एका विशेष मुलाखतीत जेफरीजचे ग्लोबल हेड ऑफ इक्विटी स्ट्रॅटेजी, ख्रिस वूड यांनी अशा परिस्थिती स्पष्ट केल्या, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव प्रति औंस 10000 डॉलर्सपर्यंत पोहचू शकतात.

 

गेल्या वर्षभरात रॉकेटच्या स्पीडने ऐतिहासिक उसळी घेतलेल्या सोन्याच्या किंमती यावर्षी पुन्हा एकदा गुंतवणूकदारांच्या रडारवर आहेत. जेफरीजचे ग्लोबल हेड ऑफ इक्विटी स्ट्रॅटेजी ख्रिस वुड यांनी CNBC-TV18 शी संवाद साधताना तेल, अमेरिकन ट्रेझरी यील्ड्स, सोने, उदयोन्मुख बाजारांमधील बॉण्ड व शेअर्स, भारतातील लार्ज-कॅप तसेच स्मॉल- आणि मिड-कॅप समभाग, परदेशी गुंतवणूकदारांचा ओघ आणि AI क्षेत्रातील भांडवली खर्चाच्या चक्राचे भविष्य यांबाबतची आपली मते मांडली.

 

सीएनबीसी टीव्ही18 सोबत एका विशेष संभाषणात ख्रिस वूड म्हणाले की, अमेरिकी बॉण्ड बाजारावरील दबाव खूप वाढला आणि अमेरिकेला ट्रेझरी यील्ड्स कमी ठेवण्यास भाग पडले, तर डॉलर कमकुवत होऊ शकतो व ही परिस्थिती सोन्यासाठी खूप सकारात्मक असेल. वूड म्हणाले की, अशा वातावरणात सोन्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 10000 डॉलर औंसपर्यंत पोहोचू शकते. यामुळे भारतीय कुटुंबांची आर्थिक स्थिती लक्षणीयरीत्या मजबूत होईल.

 

आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोन्याचा दर 4,366.80 डॉलर औंस आहे म्हणजे, भारतीय मार्केटमध्ये 10 ग्रॅम सोने 1.35 लाखांना मिळत आहे. अशा परिस्थितीत, जागतिक बाजारात सोने 10,000 डॉलर औंस झाले आणि डॉलरचा दर 96 रुपये राहिल्यास सोन्याची किंमत 9,60,000 रुपये होते. याला 31.10 ग्रॅमने भागल्यास एका ग्रॅम सोन्याची किंमत अंदाजे 30,865 रुपये होते, म्हणजे 10 ग्रॅम सोन्याची किंमत अंदाजे 3,08,650 रुपये होते. म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतीचा मागोवा घेत भारतात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 3 लाखांपेक्षा जास्त असू शकते.

 

जागतिक बाजारात सोन्याची किंमत 10,000 डॉलरवर पोहोचली तर, भारतीय बाजारात सोन्याचा दर अंदाजे 3,08,650 लाख रुपयांवर वाढू शकतो. अशा स्थितीत, सध्याच्या किमतींवरून सोन्याचा भाव 1,73,870 रुपये 10 ग्रॅम आणि सध्याच्या आंतरराष्ट्रीय किमतीच्या तुलनेत सोन्यामध्ये सुमारे 129 टक्के वाढू शकतो. दुसरीकडे, आता एखाद्या कुटुंबाकडे 100 ग्रॅम सोने असेल, तर त्याची मूळ किंमत सुमारे 30.86 लाख रुपयेपर्यंत होऊ शकते आणि एक किलो सोन्याची किंमत अंदाजे 3.09 कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल.

 

ख्रिस वूड यांचे संपूर्ण भाकीत अमेरिकेच्या बॉण्ड बाजार आणि डॉलरच्या हालचालीशी निगडित आहे. वाढते कर्ज आणि जास्त व्याजामुळे भविष्यात अमेरिकन सरकारला ट्रेझरी यील्ड्स नियंत्रित करावे लागू शकतात, असे वूड म्हणतात. ट्रेझरी यील्ड म्हणजे अमेरिकन सरकारी बॉण्ड्सवरील परतावा. अमेरिकी सरकार आपला खर्च भागवण्यासाठी आणि जुने कर्ज फेडण्यासाठी बॉण्ड्स विकून निधी उभारते. त्यामुळे, गुंतवणूकदारांना जास्त परतावा हवा असल्यास सरकारचा व्याजाचा खर्च वाढतो. अशा स्थितीत, जागतिक वित्तीय बाजारासाठी फेडरल फंड्स रेटपेक्षा अमेरिकेचा 10-वर्षीय ट्रेझरी यील्ड अधिक महत्त्वाचा असून वूड यांनी ट्रॅफिक लाईटच्या उदाहरणाने स्पष्ट केले.

 

वूड म्हणतात की, 4.5% ओलांडणारा 10 वर्षीय यील्ड येलो अलर्टसारखा दिसतो, जो 5% च्या पुढे गेला तर रेड अलर्ट मानले जाईल. यामुळे शेअर बाजार आणि इतर जोखमीच्या मालमत्तांवर मोठा दबाव येऊ शकतो. त्याचवेळी, अमेरिकन सरकार किंवा फेड रिझर्व्हने बॉण्ड यील्ड्स कमी ठेवण्यास बाजारात हस्तक्षेप केला, तर प्रणालीमध्ये अधिक पैसा येऊ शकतो. यामुळे डॉलरवरील दबाव वाढू शकतो.

 

दुसरीकडे, डॉलर कमजोर झाल्यास सोन्याला संयत आधार मिळतो. सोन्याची आंतरराष्ट्रीय किंमत डॉलरमध्ये ठरवली जाते आणि अमेरिकी चलन कमजोर झाल्यास इतर देशांतील खरेदीदारांना सोने अधिक आकर्षक ठरू शकते. याशिवाय जेव्हा सरकारे अधिक चलन छापतात किंवा व्याजदर सक्तीने कमी ठेवतात, तेव्हा चलनाचे अवमूल्यन होण्याच्या भीतीने गुंतवणूकदार सोने खरेदी करतात.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती