Xtreme Today 12-09-2026 22:50:09 598135190
ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये सहभागी देशांनी भारतावर झालेल्या पहलगाम हल्ल्याचा केला तीव्र निषेध; कुठल्याही प्रकारचा दहशतवाद खपवून घेणार नाही, असा स्पष्ट संदेश नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - दिल्लीत दोन दिवसीय ब्रिक्स शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. आज या शिखर परिषदेचा पहिला दिवस आहे. या शिखर परिषदेमध्ये ब्रिक्सच्या सदस्य देशांनी संयुक्त घोषणापत्र 2026 स्विकारले आहे. या 45 पानांच्या घोषणापत्रात दहशतवादाचा विरोध करण्यात आला आहे. या संयुक्त घोषणापत्रात दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेण्यात आली आहे. तसेच ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये सहभागी झालेल्या देशांनी यावेळी भारतावर झालेल्या पहलगाम हल्ल्याचा देखील तीव्र निषेध केला आहे. कुठल्याही प्रकारचा दहशतवाद खपवून घेणार नाही असा स्पष्ट संदेश या शिखर परिषदेमधून देण्यात आला आहे. शिखर परिषदेमध्ये चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग, रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन आणि इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान हे देखील सहभागी झाले आहेत. ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेण्यात आली आहे. कुठल्याही प्रकारचा दहशतवाद खपवून घेणार नाही, असा स्पष्ट संदेश या शिखर परिषदेमध्ये सहभागी झालेल्या सदस्य देशांकडून देण्यात आला आहे. तसेच या ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये भारतावर झालेल्या पहलगाम हल्ल्याचा देखील तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. तसेच दहशतवादी हल्ल्यांविरोधात कडक पाऊले उचलली जातील असा ठराव या परिषदेमध्ये संमत करण्यात आला आहे. तसेच इतरही अनेक महत्त्वाचे ठराव या परिषदेमध्ये समंत करण्यात आले आहेत. या शिखर परिषदेमध्ये ब्रिक्सच्या सदस्य देशांनी संयुक्त घोषणापत्र 2026 स्विकारले आहे. या 45 पानांच्या घोषणापत्रात अनेक ठरावांचा समावेश आहे.