ब्रिक्स संमेलनामुळे अमेरिकन मीडियाला धक्का बसला आहे. न्यूयॉर्क टाइम्ससह अनेक वृत्तपत्रांनी ब्रिक्सच्या विस्तारावर केली नकारात्मक टीका!
Xtreme Today
11-09-2026 19:37:06
698032742
ब्रिक्स संमेलनामुळे अमेरिकन मीडियाला धक्का बसला आहे. न्यूयॉर्क टाइम्ससह अनेक वृत्तपत्रांनी ब्रिक्सच्या विस्तारावर केली नकारात्मक टीका!

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - भारतातील ब्रिक्स संमेलनासाठी उपस्थित असलेले, जगातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या आणि जीडीपी असलेले हे देश अमेरिकेच्या जागतिक वर्चस्वाला आव्हान देत आहेत त्यामुळे अमेरिकन मीडियाला धक्का बसला आहे. न्यूयॉर्क टाइम्ससह अनेक वृत्तपत्रांनी ब्रिक्सच्या विस्तारावर नकारात्मक टीका केली आहे. “ब्रिक्सची आर्थिक शक्ती दोन पटीने वाढली आहे. ग्रासरुटपासून फ्रंटियर टेक्नोलॉजीपर्यंत इनोवेशनची नवीन शक्यता आकाराला येत आहे. ब्रिक्सचा स्पीड स्पष्टपणे दिसतोय. भारतात आयोजित हा फोरम आतापर्यंतचा सर्वात मोठा ब्रिक्स बिझनेस फोरम आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
दिल्लीत ब्रिक्स देशांचं संमेलन सुरू झाले आहे. शनिवार आणि रविवार हे दोन दिवस संमेलन होत आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यासहीत अनेक देशांचे प्रमुख नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. याशिवाय चीनचे सर्वेसर्वा शी जिनपिंग हे शनिवारी दिल्लीत येणार आहेत. जवळपास अर्ध जग दिल्लीत आलं आहे. मात्र, अमेरिकन मीडियाला या संमेलनाच्या चांगल्याच मिर्च्या झोंबल्या आहेत. अमेरिकेचं महत्त्वाचं वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सने ब्रिक्सवर दोन वृत्तांत छापले आहेत. यातील एका रिपोर्टमध्ये या समिटवर थेट टीका केली आहे. त्यावरून अमेरिकन मीडियाला चांगल्याच मिर्च्या झोंबल्याचं दिसून येत आहे. अर्ध जग दिल्लीत जमणं हे अमेरिकेच्या वर्चस्वाला धक्का देणारं असल्याचं अमेरिकेन मीडियाला वाटत आहे. त्यामुळेच समिटचा अमेरिकन मीडियाने नकारात्मक रिपोर्ट छापला आहे. “ब्रिक्सची आर्थिक शक्ती दोन पटीने वाढली आहे. ग्रासरुटपासून फ्रंटियर टेक्नोलॉजीपर्यंत इनोवेशनची नवीन शक्यता आकाराला येत आहे. ब्रिक्सचा स्पीड स्पष्टपणे दिसतोय. भारतात आयोजित हा फोरम आतापर्यंतचा सर्वात मोठा ब्रिक्स बिझनेस फोरम आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
जगभरातील अर्ध्याहून अधिक देशाचे प्रतिनिधी या समिटमध्ये सामिल झाले असले तरी त्यांच्यात तीव्र मतभेद आहेत, असं न्यूयॉर्क टाइम्सने म्हटलं आहे. चीन, रशिया, ब्राझिल आणि भारताला वाटतं पाश्चात्य देशांवरील अवलंबित्व कमी व्हावं. त्यात यूएईसारखा देशही सहभागी आहे. यूएईची अमेरिकेशी संरक्षण भागिदारी आहे. या शिवाय इराणही यात आहे. याच इराणने यूएईवर हल्ला केला होता. अमेरिकेच्या निर्बंधानंतरही आम्ही एकटे नाही आहोत, हे दाखवण्याचा इराणचा प्रयत्न आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या मंचावर एक पॉवर बॅलन्स सारखे आहेत. ते जिओपॉलिटिकल राजकारणात पॉवर बॅलन्स शोधत आहेत, असं न्यूयॉर्क टाइम्सने म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये बोलताना भारताच्या आर्थिक प्रगतीचं, विकासाच्या गतीचं गुणगान केलं. “आज ब्रिक्सचे देश जगातील 50 टक्के लोकसंख्या 40 टक्के जीडीपी आणि 25 टक्क्यांपेक्षा जास्त व्यापार करतात. या वर्षात ग्लोबल जीडीपी 2.5 पट वाटला तेच ब्रिक्स देशाची एकत्र जीडीपी ४.५ पट आहे” अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
शनिवार आणि रविवार हे दोन दिवस संमेलन होत आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यासहीत अनेक देशांचे प्रमुख नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. याशिवाय चीनचे सर्वेसर्वा शी जिनपिंग हे शनिवारी दिल्लीत येणार आहेत. जवळपास अर्ध जग दिल्लीत आलं आहे. मात्र, अमेरिकन मीडियाला या संमेलनाच्या चांगल्याच मिर्च्या झोंबल्या आहेत. अमेरिकेचं महत्त्वाचं वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सने ब्रिक्सवर दोन वृत्तांत छापले आहेत. यातील एका रिपोर्टमध्ये या समिटवर थेट टीका केली आहे. त्यावरून अमेरिकन मीडियाला चांगल्याच मिर्च्या झोंबल्याचं दिसून येत आहे. अर्ध जग दिल्लीत जमणं हे अमेरिकेच्या वर्चस्वाला धक्का देणारं असल्याचं अमेरिकेन मीडियाला वाटत आहे. त्यामुळेच समिटचा अमेरिकन मीडियाने नकारात्मक रिपोर्ट छापला आहे.
जगभरातील अर्ध्याहून अधिक देशाचे प्रतिनिधी या समिटमध्ये सामिल झाले असले तरी त्यांच्यात तीव्र मतभेद आहेत, असं न्यूयॉर्क टाइम्सने म्हटलं आहे. चीन, रशिया, ब्राझिल आणि भारताला वाटतं पाश्चात्य देशांवरील अवलंबित्व कमी व्हावं. त्यात यूएईसारखा देशही सहभागी आहे. यूएईची अमेरिकेशी संरक्षण भागिदारी आहे. या शिवाय इराणही यात आहे. याच इराणने यूएईवर हल्ला केला होता. अमेरिकेच्या निर्बंधानंतरही आम्ही एकटे नाही आहोत, हे दाखवण्याचा इराणचा प्रयत्न आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या मंचावर एक पॉवर बॅलन्स सारखे आहेत. ते जिओपॉलिटिकल राजकारणात पॉवर बॅलन्स शोधत आहेत, असं न्यूयॉर्क टाइम्सने म्हटलं आहे.
भारत आणि चीनच्या मतभेदावरही या वृत्तात म्हटलं आहे. भारत आणि चीन भलेही समूह संस्थापक सदस्य असेल. पण दोघांमध्ये तीव्र मतभेद आहेत. जगात बीजिंगचा प्रभाव वाढू नये हे भारताला नेहमी वाटतं. तसेच भारताने रशियाशी भलेही दोस्ती वाढवली असेल पण त्यांना अमेरिकेला विरोधही करायचा नाहीये. ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेसह इजिप्त, ईराण, सौदी अरब, इंडोनेशिया या समिटचा भाग आहेत. आणखी दहा देशांचाही यात समावेश आहे. या सर्वांची लोकसंख्या पाहिली तर जगाच्या अर्ध्या लोकसंख्ये एवढी आहे. जगातील 40 टक्के जीडीपी यांची आहे. एवढी मोठी ताकद असूनही या देशांमध्ये समान धागा असणाऱ्या गोष्टी फारच कमी आहेत. त्यामुळे या समिटला यश मिळण्याची शक्यता कमी आहे, असंही या वृत्तपत्राने म्हटलं आहे.
हे देश एकसमान उद्देशासाठी आपआपसात संघर्ष करत आहेत. या समूहात कोणताही एक समान उद्देश नाहीये. चीन, रशिया आणि इराणचा प्रयत्न हाच आहे की अमेरिकेला पर्याय म्हणून एक वैकल्पिक वर्ल्ड ऑर्डर तयार व्हावी.याशिवाय काही देश अमेरिकेच्या जवळचे आहेत. पण ते या तीन देशांच्या मतांशी सहमत नाहीये, असंही या वृत्तपत्राने म्हटलं आहे. इजिप्तला अमेरिकेची मदत मिळालेली आहे. यूएईमध्ये तर अमेरिकेचा बेस आहे. रशिया आणि इराणला मात्र आपण एकटे नाही आहोत, हे दाखवायचं आहे. या समिटच्या माध्यमातून आपण जगाच्या मुख्य प्रवाहात आहोत हे दाखवण्याचा त्यांचा खटाटोप आहे. पाश्चात्य देशाच्या तुलनेत आपल्याकडे असंख्य ताकदवान देश आहेत हे दाखवण्याचा पुतिन यांचा प्रयत्न आहे, असं या विषयावरती न्यूयॉर्क टाइम्सने रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
यावेळी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, “मागच्या 12 वर्षात भारताने इकोनॉमिक, ट्रेड पॉलिसीला आधार बनवलं आहे. जागतिक परिस्थिती अनिश्चिततेची असताना भारत विकास आणि स्थिरतेचा विश्वास देत आहे. रोड, रेल्वे, पॉड्स, एअरपोर्टचा वेगाने विस्तार करत आहे. सोबत जहाज निर्माण करणारे शिप बिल्डर, क्रिटिकल मिनरल्स, बॉयोटेक सारख्या क्षेत्रात नवीन क्षमता विकसित करत आहे. या क्षेत्रात भारत ग्लोबल बिझनेस, नवीन संधीचं केंद्र बनत आहे. म्हणून मेक इन इंडिय, स्कोल फॉर वर्ल्ड, भारतात स्टार्टअप क्रांती होत आहे” असंही यावेळी मोदी म्हणाले.
“दोन लाखापेक्षा अधिक स्टार्टअप भारतात आहेत. ग्लोबल सोल्युशनस हब बनत आहे. याची एक झलक तुम्हाला इनोवेट एक्सपो मध्ये दिसेल. आमचे स्टार्टअप एआय, हेल्थ केअर, ग्रीन हायड्रोजन, डिफेनस यामध्ये नवीन झेप घेत आहेत. आता ब्रिक्सच्या माध्यमातून वर्ल्ड क्लास इनोवेशन ग्लोबल मार्केट पर्यंत पोहोचायचं आहे” असं पीएम मोदी म्हणाले. “भारतात डिजिटल व्यवहारांना नवीन गती मिळाली आहे. आज जगातील 50 टक्के रिअल टाइम पेमेंट याच टोक्नोलॉजीवर होत आहे. या डजिटल लेयर नवी सोल्युशन एक नवीन ओपन इको सिस्टिम दिली आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. भारताच्या या वर्ल्ड क्लास इकोसिस्टिमला अनेक देश स्वीकारत आहेत. ब्रिक्स देश या अनुभवाच्या आधारावर आपल्या देशांसाठी नवीन सोल्युशन्स बनवू शकतात. आज जगात ट्रेड बॅरियर अडथळे वाढत आहेत. भारत इकोनॉमिक ब्रिजेस बनवत आहे. 2024 पासून जगातील 40 देशांसोबत मुक्त व्यापर करार केला आहे. ब्रिक्समध्ये आमचा अप्रोच आहे, अडथळे कमी करुन व्यवसायात संधी वाढवणं हा उद्देश आहे” असं पीएम नरेंद्र मोदी म्हणाले. जगात ट्रेड बॅरियर अडथळे वाढत आहेत, या वाक्याचा संदर्भ अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केलेल्या टॅरिफ वॉरशी आहे. त्यावर पीएम मोदींनी नाव न घेता ट्रम्प यांना जागा दाखवून दिली अशी सत्रात चर्चा झाली.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.