Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 नॅशनल न्यूज

दिशा सालियान प्रकरणाचा तपास सीबीआयकडे; आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ

Xtreme Today   02-09-2026 18:59:56   379850345

दिशा सालियान प्रकरणाचा तपास सीबीआयकडे; आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - दिशा सालियान प्रकरणात कोर्टाने अत्यंत मोठा निर्णय घेतला. थेट दिशाच्या प्रकरणातील तपास सीबीआयकडे दिला. हा अत्यंत मोठा दणका म्हणावा लागेल. दिशा सालियान प्रकरणात सतत आदित्य ठाकरेंचे नाव येते आहे, आता सर्वांची चाैकशी केली जाईल. 

 

दिशा सालियान प्रकरणात मोठा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला. दिशा सालियन प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून सतत आरोप केली जात आहेत. त्यातच आता कोर्टाने थेट दिशा सालियन प्रकरणाचा तपास हा सीबीआयने करावा असे म्हटले. सालियान कुटुंबाकडून सातत्याने आरोप केली जात आहेत. त्यात थेट आदित्य ठाकरेंचे नाव आले. कोणालाही आरोपी म्हणून वागणूक देऊ नये, फक्त जबाब नोंदवावा, असेही कोर्टाने म्हटले. आता दिशा सालियान प्रकरणात तपास सीबीआय करणार आहे. तपास करून योग्य तो निष्कर्ष काढा, मग आरोपपत्र दाखल करा, असेही कोर्टाने नमूद केले. कोर्टाच्या या निकालानंतर आता दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी मोठे विधान केले. त्यांनी कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले. मुंबई पोलिसांच्या तपासावर त्यांच्याकडून अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आली. आता अखेर तपास सीबीआयकडे देण्यात आला.

 

सतीश सालियान यांनी म्हटले की, कोर्टाने जे केले ते योग्य आहे. इथूनपु़ढे न्याय मिळेल हे 100 टक्के वाटतंय. कोर्ट काही चुकी नाही करणार कधीपण. आता सर्व आरोपींची चाैकशी करावी लागणार आहे. योग्य तपास झाला नसल्याचेही दिशा सालियान हिच्या वडिलांनी म्हटले. दिशाच्या वडिलांनी कोर्टाचे आभार मानले. सीबीआयच्या माध्यमातून योग्य तपास होईल, असेही दिशाच्या वडिलांनी म्हटले. दिशा सालियानचे वडील गेल्या काही दिवसांपासून न्यायाची लढाई लढत आहेत. या प्रकरणात आदित्य ठाकरेंचे थेट नाव आहे. आदित्य ठाकरेंवर सतत गंभीर आरोप केली जात आहेत. त्यातच आता थेट सीबीआयकडे हे प्रकरण गेले. त्यामुळे हा मोठा दणका नक्कीच म्हणावा लागेल.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती