एप्रिल 2026 ते जून 2026 या तिमाहीत भारताच्या रियल जीडीपीमध्ये 7.8 टक्क्यांची वाढ
Xtreme Today
01-09-2026 18:47:10
399687224
एप्रिल 2026 ते जून 2026 या तिमाहीत भारताच्या रियल जीडीपीमध्ये 7.8 टक्क्यांची वाढ
नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - एप्रिल 2026 ते जून 2026 या तिमाहीत भारताच्या रियल जीडीपीमध्ये 7.8 टक्क्यांची वाढ झाली. FY26 च्या शेवटच्या तिमाहीत रियल जीडीपीमध्ये 8.6 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली होती. एकंदरीत, FY27 च्या पहिल्या तिमाहीत त्या आधीच्या तिमाहीच्या तुलनेत 0.8 टक्क्यांची घसरण झाल्याचे दिसून येत आहे. ग्रोथ रेट 8.6 टक्क्यांवरून 7.8 टक्क्यांवर आला त्यामुळे देशातील बहुतेक नागरिकांमध्ये अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला असा समज तयार झाला आहे.
गेल्या तिमाहीच्या तुलेनेने जीडीपी ग्रोथमध्ये झालेल्या 0.8 टक्के घसरणीला क्वार्टरली मोडरेशन म्हणून पाहिले जात आहे. मुळात, देशात जीडीपीची तुलना Year Over Year या पद्धतीने केली जाते. या तुलनेत गेल्या अर्थ वर्षाच्या त्याच तिमाहीच्या निकालाची तुलना यंदाच्या तिमाहीच्या निकालाशी केली जाते. एकंदरीत, FY27 च्या पहिल्या तिमाही निकालाची तुलना FY26 च्या पहिल्या तिमाही निकालाशी केली जाईल. YoY Comparison नुसार, FY26 च्या पहिल्या तिमाहीत देशाची रियल जीडीपी 6.9 टक्क्यांनी वाढली होती. तर यंदाच्या अर्थ वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या रियल जीडीपीची वाढ 7.8 टक्के आहे.
इतर कर वगळता देशात प्रत्यक्ष आर्थिक वाढ कितीने झालीये? हे पाहण्यासातीह Gross Value Added म्हणजेच देशाची जीवीए वाढ फार महत्वाची असते. FY27 च्या पहिल्या तिमाही निकालात 8.2 टक्क्यांची जीवीए वाढ नोंदवण्यात आली आहे.
Q1FY27 मध्ये देशात उत्पादन क्षेत्रात चांगलीच वाढ झाल्याचे दिसत आहे. देशात मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये 9.2 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
देशाच्या कॅपिटल फोरमेशनमध्ये जवळपास 12 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. देशात खाजगी गुंतवणुकीला फार चालना मिळाली आहे, याचा फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेला होत आहे.
यंदाच्या तिमाहीत फायनान्शियल सर्विस ग्रोथ 12.1 टक्क्यांनी वधारली आहे. तिमाहीतील रियल जीडीपी वाढीत सर्विस क्षेत्राचा फार मोठा वाटा आहे.
अर्थ वर्ष 27 च्या पहिल्या तिमाही निकालानुसार, वस्तु आणि सेवेमागे होणाऱ्या खर्चात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ग्राहकांचा वाढता खर्च म्हणजे प्रादेशिक मागणी वाढत असल्याचा पुरावा आहे.
यंदाच्या तिमाहीतील जीडीपी वाढीत उत्पादन क्षेत्राचा मोठा वाटा आहे. परंतु, सरकारने उत्पादन क्षेत्रावर आणखीन भर देणे आवश्यक आहे. कारण, 1 सप्टेंबर 2026 रोजी आलेला ऑगस्ट मॅन्युफॅक्चरिंग PMI नुसार, देशाच्या मॅन्युफॅक्चरिंग अॅक्टीव्हीटीच्या वेगाने गेल्या पाच वर्षांची नीचांक पातळी गाठली आहे.
दरम्यान, अमेरिका-इराण देशांमध्ये असणाऱ्या तणावपूर्ण वातावरणामुळे जागतिक बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. रुपया आधीच दबावात आहे. देशात महागाई वाढत चालली आहे. या गोष्टी देशाच्या अर्थ व्यवस्थेवर परिणाम करत आहेत.
एकंदरीत, गेल्या अर्थ वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत जीडीपी ग्रोथ 8.6 टक्के होती, जी घसरून 7.8 टक्क्यांवर आली आहे. त्याकडे फक्त क्वार्टरली मोडरेशन म्हणून पाहिले जात आहे. यंदाच्या तिमाहीचा निकाल बहुतेक अर्थ तज्ञांच्या अंदाजापेक्षा उत्तम आहे. त्यात जीडीपीला आधार देणाऱ्या बऱ्याच क्षेत्रांची वाढ यंदा चांगली दिसून आली आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.