Xtreme Today 31-08-2026 19:49:49 558032562
हिंदू जागे झाल्यावर जग जागे होईल. भारताचा ‘डीएनए’ हा इतरांना मदतीचा हात पुढे करण्याचा - सरसंघचालक डॉ.मोहन भागवत टोरांटो कॅनडा (विशेष प्रतिनिधी) - हिंदू जागे झाल्यावर जग जागे होईल. भारताचा ‘डीएनए’ हा इतरांना मदतीचा हात पुढे करण्याचा आहे. भारताला एकेकाळी महासत्ता म्हणता आले असते, परंतु प्रत्यक्षात तसे झाले नाही. भारताने जगाची सेवा केली. भारतात मतभेदांना अडथळे मानले जात नाहीत. भारताची परंपरा ही लोकांना विविधतेत एकता शिकवते. संपूर्ण जग एक कुटुंब आहे, अशी भारतीयांची भावना असल्याचे स्पष्ट प्रतिपादन सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. तसेच ‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेचा अर्थ सांगितला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे सध्या कॅनडाच्या टोरंटो दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात मोहन भागवत यांनी हिंदुत्वावर मोठं विधान केलं. यावेळी भागवत यांनी भारताने जगाची सेवा केल्याचे अधोरेखित केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारताच्या एकजुटीवर महत्त्वाचं भाष्य केलं. भारत मानवतेसाठी किती योगदान देतो, यावरून देशाची प्रगती मोजली पाहिजे, असे भागवत यांन म्हटलं. यावेळी त्यांनी भारताची विविधता आणि जागतिक मैत्रीवरही भाष्य केलं. ते कॅनडाच्या टोरंटोमध्ये बोलत होते.