Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 नॅशनल न्यूज

पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे, भारतीय हवामान विभागाकडून तब्बल 17 राज्यांना पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा

Xtreme Today   10-08-2026 20:13:05   92035617

पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे, भारतीय हवामान विभागाकडून तब्बल 17 राज्यांना पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा

 

पुणे (प्रतिनिधी) - एक नाही तर 17 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे, या राज्यांमध्ये पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर आयएमडीकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 

 

पावसाळ्याच्या सुरुवातीला मान्सूनवर अल् निनोचं संकट असेल असा इशारा भारतीय हवामान विभाग (IMD) कडून देण्यात आला होता. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार काही राज्यांमध्ये अल् निनोचा कमी अधिक प्रमाणात प्रभाव पडल्याचं दिसून आलं, देशाच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे, परंतु गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये या राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाकडून दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राज्यस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, गुजरात, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागलँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपूरा अशा 17 रांज्यामध्ये पुढील 24 तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच काही भागांमध्ये वादळी वाऱ्याची देखील शक्यता असल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.

 

 

राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे, पुढील पाच दिवसांमध्ये राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पावसाची तूट झाली आहे, सोलापूर जिल्ह्यात तब्बल 33 टक्के इतकी पावसाची तूट आहे. मराठवाड्यात देखील अशीच स्थिती आहे, अनेक जिल्ह्यांमध्ये पुरेसा पाऊस न झाल्याने, पावसाची तूट निर्माण झाली आहे. यंदा सर्वाधिक पाऊस हा कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर झाला आहे. राज्यात पुढील पाच दिवस सर्वदूर पावसाची शक्यता कमीच असून, पुढील दोन महिने महाराष्ट्रात सरासरी पावसाची अपेक्षा आहे, असा अंदाज हवामान तज्ज्ञ एस.डी सानप यांनी वर्तवला आहे.  यंदा राज्यात पावसाचं प्रमाणा हे असमान राहिलं आहे, काही ठिकाणी खूप जास्त प्रमाणात पाऊस झाला, तर काही ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे असं ते म्हणाले.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती