आंदोलन करणे म्हणजे नवीन पिढी किंवा Gen Z राष्ट्रविरोधी आहे असा अर्थ होत नाही - सरसंघचालक मोहन भागवत
Xtreme Today
07-08-2026 19:35:10
496387302
आंदोलन करणे म्हणजे नवीन पिढी किंवा Gen Z राष्ट्रविरोधी आहे असा अर्थ होत नाही - सरसंघचालक मोहन भागवत
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सरसंघचालक मोहन भागवत यांनी आजच्या तरुण पिढीच्या भूमिकेचे जोरदार समर्थन केले. आंदोलन करणे म्हणजे नवीन पिढी किंवा Gen Z राष्ट्रविरोधी आहे असा अर्थ होत नाही, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. लोकशाहीत आंदोलन हे संवादाचेच एक माध्यम असून आजचे तरुण आपल्या हक्कांसाठी प्रश्न विचारत आहेत. देशाच्या शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल करण्याची गरज असून, तरुणांनी उपस्थित केलेले प्रश्न अत्यंत रास्त आहेत, असेही सरसंघचालक म्हणाले.
आंदोलन करणे म्हणजे नवीन पिढी किंवा Gen-Z राष्ट्रविरोधी आहे असा अर्थ होत नाही, असे सरसंघचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी स्पष्ट केले आहे. तरुणांशी संवाद साधताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनांचे समर्थन करत लोकशाहीत आंदोलन हे संवादाचेच एक माध्यम असल्याचे सांगितले. देशातील आजची युवा पिढी आपल्या हक्क आणि प्रश्नांसाठी प्रश्न विचारत असून, शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर आवाज उठवणे ही त्यांची योग्य तक्रार आहे, अशी महत्त्वाची भूमिका भागवत यांनी मांडली.
नवीन पिढी आणि जुन्या पिढीतील फरकावर बोलताना मोहन भागवत म्हणाले की, पूर्वीची पिढी मोठ्यांचे ऐकून घेत असे, परंतु आजची तरुण पिढी उत्तर मागते. जर नाते टिकवायचे असेल तर त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील. भारतीय परंपरेत याला 'शास्त्रार्थ' असे म्हटले जाते आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे. तरुणांनी आंदोलन करू नये असे मी म्हणणार नाही, पण ते कसे आणि कोणत्या मार्गाने करायचे याची नियमावली संविधानात दिलेली आहे. तरुण आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवत असतील तर समाज आणि प्रशासनाने त्यामागील कारणांचा गांभीर्याने विचार केला पाहिजे.
देशातील शाळांमध्ये शौचालय आणि पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधांच्या अभावावर बोलताना भागवत यांनी शिक्षण व्यवस्थेच्या व्यापारीकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. शिक्षण हा कोणताही व्यावसायिक धंदा नसून मानवी जीवनाची मूलभूत गरज आहे. त्यामुळे प्रत्येकाला शिक्षण मिळेल अशी संरचना तयार झाली पाहिजे. अनेक दशकांपासून देशातील शिक्षण व्यवस्थेवर GDP च्या 6 टक्के खर्च करण्याची मागणी केली जात असून, संघही या मागणीचे पूर्ण समर्थन करतो असे त्यांनी स्पष्ट केले. केवळ शाळा चालवून पैसे कमावणे हा शिक्षणाचा हेतू नसून, नवीन पिढी घडवणे हाच मूळ उद्देश असायला हवा, असे भागवत यांनी स्पष्ट केले.
शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांचे योग्य प्रशिक्षण होणे सर्वात आधी गरजेचे असल्याचे भागवत यांनी सांगितले. तसेच शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी केवळ सरकारवर सोडून चालणार नाही, तर समाजानेही पुढे आले पाहिजे. अनेक ठिकाणी गावकऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन शाळांची दुरुस्ती केली आहे, तर शहरांमधील लोकांच्या मदतीने ग्रामीण शाळांमध्ये संगणक पोहोचवले आहेत. त्यामुळे सरकार आणि समाज या दोघांनी मिळून देशातील शिक्षण व्यवस्था मजबूत केली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडलेला जनरेशन झेड (Gen Z) चा विशेष संवाद कार्यक्रम सध्या जोरदार चर्चेत आला आहे. 13 ते 22 वर्षे वयोगटातील तरुणांच्या मनातील प्रश्नांना ऋषभ शाह नावाचा तरुण कोण, असा प्रश्न सध्या देशभरात विचारला जात आहे. सरसंघचालकांची अत्यंत गाजलेली मुलाखत घेणारा ऋषभ शाह हा 'इंडियाज इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनायटेड नेशन्स' (IIMUN) या नामांकित आंतरराष्ट्रीय युवा संस्थेचा संस्थापक आणि अध्यक्ष आहे. ऋषभने 2011 मध्ये या संस्थेची स्थापना केली आहे. तो फक्त तरुण उद्योजक नसून अनेक महाविद्यालयांमध्ये अभ्यागत प्राध्यापक (व्हिजिटिंग फॅकल्टी) म्हणूनही कार्यरत आहे. याशिवाय कौटुंबिक व्यवसाय सांभाळत तो सामाजिक कार्यात सक्रिय असतो आणि त्याने काही पुस्तकांचे लेखनही केले आहे. शिक्षण व्यवस्था, बेरोजगारी आणि तरुणांचे मानसिक आरोग्य यांसारख्या गंभीर विषयांवर तो नेहमीच राष्ट्रीय व्यासपीठांवर आपली भूमिका मांडत असतो.
IIMUN ही 13 ते 22 वयोगटातील तरुणांमध्ये नेतृत्व आणि कूटनीतीचे कौशल्य विकसित करणारी जागतिक स्तरावरील मोठी संस्था आहे. शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी मॉडेल युनायटेड नेशन्स (MUN), नेतृत्व विकास कार्यक्रम, साहित्य उत्सव आणि अभ्यास दौरे आयोजित करण्याचे काम ही संस्था करते. यंदाचा मुंबईतील कार्यक्रम हा जगातील 15 देशांमधील 108 शहरांत पार पडलेल्या उपक्रमांचा सांगता समारंभ होता. ऋषभ शाह याने दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी 2016-17 आणि 2020-21 मध्येही मोहन भागवत या संस्थेच्या कार्यक्रमांना उपस्थित राहिले होते. यावेळच्या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे भाषणाऐवजी थेट प्रश्नोत्तरांचा संवाद घडवून आणण्यात आला.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.