Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 नॅशनल न्यूज

‘भारत जोडो’च्या धरतीवर सप्टेंबरमध्ये भारतभर यात्रा; तर डिसेंबर महिन्यात आम्ही देशभरात कँपेन, क्या बोलती पब्लिक...अभिजीत दिपके यांची घोषणा

Xtreme Today   06-08-2026 20:41:32   224372157

‘भारत जोडो’च्या धरतीवर सप्टेंबरमध्ये भारतभर यात्रा; तर डिसेंबर महिन्यात आम्ही देशभरात कँपेन, क्या बोलती पब्लिक...अभिजीत दिपके यांची घोषणा

 

छत्रपती संभाजी नगर (विशेष प्रतिनिधी) - सोजेपी आता ‘भारत जोडो’च्या धरतीवर सप्टेंबरमध्ये भारतभर यात्रा करणार आहे. तर डिसेंबर महिन्यात आम्ही देशभरात कँपेन हाती घेतले आहे.. क्या बोलती पब्लिक...आम्ही देशभरात दौरा करणार आणि त्यांच्या समस्या अडचणी समजून घेणार आहोत अशी घोषणा अभिजीत दिपके यांनी केली.

 

 

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या अध्यक्षेखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन दिवस सीजेपीची बैठक झाली. या बैठकीत महत्वाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. याच बैठकीत पक्षाची ध्येय ठरणार होते. आता पुढे कॉकरोच जनता पार्टीचे काय होणार हे नुकताच अभिजीत दिपके यांनी सांगितले. अभिजीत दिपके यांनी म्हटले की, 25 जुलैला या देशाच्या तरुणांनी हे करून दाखवलं ते बारा वर्षात कोणालाही करता आलं नाही. जे सरकार म्हणत होती या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत ते करून दाखवला आहे. फक्त राजीनामा ठेवून दाखवला नाही तर सरकारला झुकवला आहे राजीनामा घ्यायला भाग पाडला आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा आमचा सगळ्यात मोठा विजय होता. या सरकारने मागच्या दहा-बारा वर्षे दडपशाही भीती निर्माण केली होती ती भीती आता संपली आहे.

 

अभिजीत दिपके यांनी म्हटले की, सप्टेंबर महिन्यात पक्षाचे सर्वकाही ठरेल. आता देशाचे नागरिक रस्त्यावर येतील आता एकाचा राजीनामा मागितला. उद्या दुसऱ्याचा सुद्धा मागू शकतो. सीजेपी नेमकी काय आहे हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी पंडित जवाहरलाल यांनी जे स्वप्न पाहिलं होतं त्यांच्या विचारावर चालणारे ही पार्टी असणार आहे. देशभरातील लोकांसोबत अभिजीत दिपके संवाद साधणार आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडोप्रमाणेच असेल. 

 

जी संविधानाचे विचारधारा आहे तीच आमचे विचारधारा आहे. आम्ही शेकूलर आहोत. लोकशाहीवर भरोसा ठेवतोय. येणाऱ्या डिसेंबर महिन्यात आम्ही देशभरात कँपेन करणार आहे,  त्याचं नाव असेल... क्या बोलती पब्लिक… आम्ही देशभरात दौरा करणार आहे, त्यांच्या समस्या अडचणी समजून घेणार आहे. शिक्षण बेरोजगारी याबद्दल कोणी बोलत नाही, संसदेत कोणी बोलत नाही. सरकार तर असं वाटते की हा काही मुद्दा नाही सरकार फक्त एकच मुदत असते हिंदू मुसलमान. शिक्षणाची वाईट अवस्था यावर कोणी बोलायला तयार नाही. आम्ही लोकांमध्ये जाणार आहे लोकांच्या समस्या अपेक्षा समजून घेणार आहे असेही अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केले.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती