Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 स्पेशल स्टोरी

अमेरिकेचे सैन्य कमांडर आणि एनएसजी फोर्स वन या तिन्ही सुरक्षा दलाकडून हिंजवडी आयटी पार्कमध्ये मॉक ड्रिल; अचानक दहशतवादी हल्ला झाल्यासारखे चित्र

Xtreme Today   06-08-2026 20:32:30   73529062

अमेरिकेचे सैन्य कमांडर आणि एनएसजी फोर्स वन या तिन्ही सुरक्षा दलाकडून हिंजवडी आयटी पार्कमध्ये मॉक ड्रिल; अचानक दहशतवादी हल्ला झाल्यासारखे चित्र

 

पुणे (प्रतिनिधी) - पुण्यातील  हिंजवडीतील आयटी पार्क येथे खळबळजनक घटना घडली. थेट अचानक NSG कमांडर आणि अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो आयटी पार्कमध्ये शिरले. यादरम्यान उपस्थित लोक प्रचंड घाबरले. नक्की काय घडले कोणालाच कळत नव्हते. फक्त भारतीय लष्करच नाही तर अमेरिकेचे कमांडर पोहोचल्याने सर्वजण गोंधळात होती. अत्यंत गुप्तता यादरम्यान पाळण्यात आली. अमेरिकेचे लष्कर हिंजवडी आयटी पार्कमध्ये नक्की का आले आण काय घ़डले, यावरून विविध चर्चा या रंगताना दिसल्या. आयटी कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची दहशत होती. 

 

हिंजवटी फेज 2 मध्ये इन्फोसिसच्या कॅम्पमध्ये पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड याच्या सहकार्याने मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले. या मॉक ड्रिलमध्ये अमेरिकेच्या सैन्यातील तब्बल 17 कमांडो सहभागी झाली होती. त्यांच्यासोबत 26 स्पेशल कॉम्पोझिट ग्रुपचे अधिकारी, कमांडो, फोर्स वन आणि पुणे पिंपरी चिंचवड दहशतवादी विरोझी शाळा, दंगल नियंत्रण पथक, बॉम्बशोधक पथक, आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात करण्यात आले होते.

 

5 ऑगस्ट रोजी दुपारी 3 ते 9 दरम्यान मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. दहशतवादी हल्ला झाल्यावर प्रतिसाद नक्की कसा द्यायचा याचे प्रशिक्षण यादरम्यान देण्यात आले. कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. रात्री 9 पर्यंत हे मॉक ड्रिल सुरू होते. अत्यंत गुप्तता या मॉक ड्रिलबद्दल पाळण्यात आली होती. याबाबत कोणालाही माहिती नव्हती. अमेरिकेचे सैन्य कमांडर आणि एनएसजी फोर्स वन या तिन्ही सुरक्षा दलाकडून आयटी पार्कमध्ये मॉक ड्रिल घेण्यात आले. दहशतवादी हल्ला झाल्यासारखे चित्र निर्माण करण्यात आले. एक दोन नाही तर तब्बल सहा तास हे मॉक ड्रिल सुरू होते. अत्यंत मोठी गुप्तता यादरम्यान पाळण्यात आली. आयटी पार्कमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, असे चित्र निर्माण करण्यात आले होते.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती