Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 नॅशनल न्यूज

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी केंद्रीय मंत्रिमंडळातील आपल्या पदाचा राजीनामा; कॉकरोच जनता पक्ष (CJP) ने आज 'तात्काळ प्रभावाने' आपले आंदोलन मागे घेत असल्याची केली घोषणा

Xtreme Today   25-07-2026 21:22:38   425761570

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी केंद्रीय मंत्रिमंडळातील आपल्या पदाचा राजीनामा; कॉकरोच जनता पक्ष (CJP) ने आज 'तात्काळ प्रभावाने' आपले आंदोलन मागे घेत असल्याची केली घोषणा

 

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) – केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी केंद्रीय मंत्रिमंडळातील आपल्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यान, कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने केंद्र सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर सुरू असलेले आंदोलन तात्काळ मागे घेण्याची घोषणा केली.

 

शनिवारी (२५ जुलै २०२६) केंद्र सरकारसोबत झालेल्या तिसऱ्या फेरीच्या चर्चेनंतर कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन मागे घेण्यास सहमती दर्शवली.

 

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि जे. पी. नड्डा यांच्यासोबत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत कॉकरोच जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका म्हणाले, “सरकारच्या प्रतिनिधींसोबत आमच्या तीन फेऱ्यांच्या चर्चा झाल्या. जंतर-मंतर येथे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आमच्या आंदोलनाच्या तीन प्रमुख मागण्या होत्या. पहिली म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. दुसरी म्हणजे आंदोलक आणि आयोजकांविरोधात दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे (एफआयआर) मागे घ्यावेत आणि भविष्यात कोणतेही नवीन गुन्हे दाखल करू नयेत. तिसरी मागणी म्हणजे NEET परीक्षा न झाल्यामुळे ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले, त्यांच्या कुटुंबियांना ₹१ कोटींची नुकसानभरपाई द्यावी. काही वेळापूर्वीच धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असून त्यामुळे आमची पहिली मागणी मान्य झाली आहे.”

ते पुढे म्हणाले, “आमच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्यामुळे आम्ही सर्व आंदोलकांना आवाहन करतो की त्यांनी तात्काळ आंदोलन मागे घेऊन शांततेत आपल्या घरी परतावे.

 

CJP चे आणखी एक सदस्य सौरव दास म्हणाले, “आमची दुसरी मागणी अशी होती की केवळ दिल्लीतीलच नव्हे तर भाजपशासित आणि भाजपच्या सहयोगी राज्यांमध्ये आंदोलकांविरोधात दाखल करण्यात आलेले सर्व एफआयआर मागे घ्यावेत. सरकारने ही मागणीही मान्य केली आहे. हे एफआयआर लवकरच मागे घेतले जातील. सरकारने आम्हाला दाखल करण्यात आलेल्या सर्व एफआयआरच्या प्रती देण्याचे आश्वासन दिले आहे. आमच्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये १५ ते २० एफआयआर दाखल झाले आहेत. येत्या तीन ते चार दिवसांत त्या प्रती आम्हाला मिळतील. तसेच एफआयआर मागे घेण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल.

 

ते पुढे म्हणाले, “यासंदर्भात आम्ही सरकारला लेखी हमीचा मसुदा दिला आहे. सरकारने मंगळवारपर्यंत त्यावर आपली लेखी हमी देण्याचे आश्वासन दिले आहे. आम्हाला आशा आहे की मंगळवारपर्यंत एफआयआर मागे घेणे आणि भविष्यात कोणतीही कारवाई न करण्याबाबत सरकारची लेखी हमी मिळेल.”

आशुतोष रांका यांनी शेवटी पुन्हा एकदा सांगितले, “आमच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. त्यामुळे आम्ही सर्व आंदोलकांना तात्काळ आंदोलन मागे घेऊन शांततेत घरी परतण्याचे आवाहन करतो. पुढील रणनीती किंवा इतर विषयांबाबत आम्ही योग्य वेळी माहिती देऊ.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती