अण्णा हजारे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने सरकार कोसळणार नाही
Xtreme Today
23-07-2026 21:57:41
113764657
अण्णा हजारे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने सरकार कोसळणार नाही
शिर्डी/पुणे (विशेष प्रतिनिधी) - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शिर्डीत आंदोलन सुरु केले आहे.अण्णा हजारे यांनी नीट परीक्षा घोटाळ्यात शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यावरुन दिल्लीत सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन दिले आहे. शिर्डीतील वाडीया पार्क येथे गांधी मेमोरियल येथे अण्णांनी मौन आंदोलन छेडले आहे. अण्णा हजारे यांची तब्येत ठीक नसूनही त्यांनी या मौन आंदोलनात सहभागी होत काही काळी मौन व्रत धारण केले.
अण्णा हजारे यांनी, याच ठिकाणी १५ वर्षांहून अधिक काळापूर्वी ऐतिहासिक उपोषण केले होते. त्यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून, "हिंसाचार आणि पोलिसांच्या कारवाईच्या बातम्या अत्यंत वेदनादायक आहेत," असे म्हटले.
आंदोलकांच्या संतापाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून नव्हे, तर समाजाच्या वेदना आणि अपेक्षांचे प्रतीक म्हणून पाहिले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देण्यास सांगितले, तर त्यामुळे सरकार कोसळणार नाही; उलट सरकारचे कामकाज अधिक जबाबदार आणि प्रभावी होईल, असे हजारे यांनी म्हटले.
तसेच, आंदोलकांचे म्हणणे संयमाने ऐकावे, विश्वासाचे वातावरण निर्माण करावे आणि सकारात्मक संवादाच्या माध्यमातून तोडगा काढावा, अशी विनंती त्यांनी सरकारला केली.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.