Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 नॅशनल न्यूज

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरचे काम वेगात; जपानची E10 ट्रेन येण्यापूर्वीच भारतनिर्मित ट्रेन धावणार

Xtreme Today   17-07-2026 19:00:00   156327878

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरचे काम वेगात; जपानची E10 ट्रेन येण्यापूर्वीच भारतनिर्मित ट्रेन धावणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल प्रकल्पाबाबत भारत आणि जपान सरकारांनी एक महत्त्वाचा संयुक्त निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही देशांतील द्विपक्षीय चर्चा अत्यंत सकारात्मक झाल्या असून, नियोजित वेळेपूर्वीच देशातील पहिली बुलेट ट्रेन सुरू करण्यावर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आहे.

 

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील नागरी कामे (पिलर आणि ट्रॅक उभारणी) विशेषतः गुजरातमधील भागात वेगाने सुरू आहेत. या प्रकल्पाचा पहिला प्राधान्य विभाग 2027 पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. जपानने भारतीय हवामान आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन विकसित करण्यात येणाऱ्या अत्याधुनिक E10 Series बुलेट ट्रेन भारताला देण्यास सहमती दर्शवली आहे. मात्र, या ट्रेन सध्या जपानमध्ये संशोधन आणि विकासाच्या टप्प्यात असून त्यांचा पुरवठा 2030 च्या दशकाच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे.

 

सन 2027 पर्यंत बुलेट ट्रेनचा कॉरिडॉर तयार होणार आहे, तर दुसरीकडे जपानच्या E10 ट्रेनसाठी 2030 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार होती. त्यामुळे प्रकल्पाला विलंब होऊ नये आणि शक्य तितक्या लवकर हाय-स्पीड रेल्वे सेवा सुरू व्हावी, या उद्देशाने भारत आणि जपानने संयुक्त निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार 2027 मध्ये कॉरिडॉर सुरू होताच प्रारंभीची सेवा भारतात विकसित करण्यात आलेल्या हाय-स्पीड ट्रेनद्वारे सुरू केली जाणार आहे. बंगळुरूस्थित BEML (बीईएमएल) कंपनी B28 आणि B35 या सेमी हाय-स्पीड ट्रेनसेटची निर्मिती करत आहे. या ट्रेन ताशी 250 ते 400 किमी वेगाने धावू शकतात. दरम्यान, जपानच्या E10 Series बुलेट ट्रेन ताशी 400 किमीपेक्षा अधिक वेगाने धावण्यास सक्षम असल्याचे चाचण्यांमधून सिद्ध झाले आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती