Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 नॅशनल न्यूज

UMANG App मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर सुरक्षा त्रुटी; लाखो भारतीय नागरिकांचा अत्यंत गोपनीय आणि महत्त्वाचा डेटा लीक

xtreme2day   14-07-2026 21:28:12   437890623

UMANG App मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर सुरक्षा त्रुटी; लाखो भारतीय नागरिकांचा अत्यंत गोपनीय आणि महत्त्वाचा डेटा लीक 

 

नवी दिल्ली (प्रतिनिधी) - सरकारी सेवांसाठी वापरल्या जाणाऱ्या UMANG App मधील डेटा लीकच्या बातमीने युजर्सच्या चिंतेत मोठी भर घातली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, लीक झालेल्या डेटामध्ये लोकांचे आधार क्रमांक आणि LPG गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित अत्यंत खाजगी तपशील उघड झाले आहेत. अनेक वर्षांपासून ॲपमध्ये असलेल्या तांत्रिक त्रुटींमुळे हा मोठा सायबर सुरक्षेचा धोका निर्माण झाला आहे.

 

 

केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या UMANG App मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर सुरक्षा त्रुटी असल्याचे एका ताज्या रिपोर्टमधून उघड झाले आहे. या सुरक्षेतील त्रुटींमुळे लाखो भारतीय नागरिकांचा अत्यंत गोपनीय आणि महत्त्वाचा डेटा लीक झाला असून, यामध्ये EPFO अंतर्गत येणारा PF खातेधारकांचा UAN क्रमांक समाविष्ट आहे.EPFO संबंधित काम असो, सरकारच्या कोणत्याही योजनेची माहिती हवी असेल, आजकाल बहुतांश लोक UMANG App चा वापर करतात. पण तुम्हाला माहित आहे की या सरकारी ॲपवरही तुमचा वैयक्तिक डेटा सुरक्षित नाही.

 

द हिंदू'च्या ताज्या रिपोर्टनुसार दोन सुरक्षा संशोधकांनी 'युनिफाइड मोबाइल ॲप्लिकेशन फॉर न्यू-एज गव्हर्नन्स'मध्ये अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. हे ॲप केंद्र आणि राज्य सरकारच्या शेकडो सेवा जनतेसाठी एकत्र आणते. ॲपमधील काही त्रुटींमुळे लाखो भारतीयांची महत्त्वाची माहिती लीक झाली आहे. या असुरक्षित डेटामध्ये EPFO संबंधित माहितीचाही समावेश आहे. 

लीक झालेल्या डेटामध्ये EPFO चा UAN नंबर, एका मोठ्या गॅस कंपनीकडे LPG सिलिंडर बुकिंगची माहिती, अनेक सेवांमधील लोकांचा आधार क्रमांक यांचा समावेश आहे. अनेक सेवांमध्ये, लोकांचे आधार क्रमांक कोणत्याही सुरक्षा लॉकशिवाय जतन केले गेले. आधार कायदा, 2016 अंतर्गत सुरक्षेशिवाय आधार क्रमांक ठेवण्यास पूर्णपणे मनाई आहे. या बिघाडामध्ये उमंग ॲपची मुख्य यंत्रणा पूर्णपणे सुरक्षित होती. 

 

 

वास्तविक, EPFO ही उमंगची सर्वाधिक वापरली जाणारी सेवा आहे, ज्यामध्ये गेल्या तीन महिन्यांत 40 कोटींहून अधिक व्यवहार झाले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ‘द हिंदू’ला दिलेल्या निवेदनात या त्रुटींची कबुली दिली. मंत्रालयाने म्हटले आहे की त्याच्या विकास आणि सुरक्षा पथकांनी या गोष्टींची काळजीपूर्वक तपासणी केली आहे आणि आवश्यक सुधारात्मक आणि प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी करीत आहेत. संबंधित API मधील प्लेनटेक्स्ट माहिती योग्यरित्या एन्क्रिप्ट केली गेली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून API व्यवहारांच्या नोंदींचा आढावा घेतल्यावर असे आढळून आले आहे की उमंग पोर्टलवरील व्यवहारांवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती