Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 स्पेशल स्टोरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन; वारकरी, शेतकऱ्यांना सुखी ठेव, मुख्यमंत्र्यांचे विठुराया चरणी साकडे

xtreme2day   10-07-2026 23:26:35   419327734

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन; वारकरी, शेतकऱ्यांना सुखी ठेव, मुख्यमंत्र्यांचे विठुराया चरणी साकडे

 

पुणे (विशेष प्रतिनिधी) - आज आषाढी वारी सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन घेतले. मंदिरात त्यांच्या हस्ते पालखीची पूजा झाली. तसेच संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात आषाढी वारीमध्ये सहभागी होणे अतिशय सुंदर अनुभूती आहे; महाराष्ट्राच्या या परंपरेतून असीमित ऊर्जा मिळते, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुका आणि श्री निवडुंगा विठोबाचे दर्शन घेतल्यानंतर व्यक्त केली. वारीत सहभागी झालेले वारकरी आणि शेतकऱ्यांना सुखी ठेव, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठुराया चरणी घातले. 

 

 मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचा मंदिर समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी आषाढीवारी निमित्त पालखीसोबत पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

 

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महापौर मंजुषा नागपुरे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आ. हेमंत रासने,विभागीय आयुक्त श्रीमती शीतल तेली - उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळा प्रमुख ॲड राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजन नाथ, पालखी विठ्ठल मंदिर संस्थांचे विश्वस्त उपस्थित होते. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर वारकरी व भक्तगण उपस्थित होते.

 

 गुरुवारी विठ्ठल नाम आणि 'ज्ञानोबा तुकाराम'च्या जयघोषात टाळ मृदुंगाच्या तालावर भक्तिमय वातावरणात, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे विठ्ठल मंदिरात आगमन झाले.

 

जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन

 

 संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात आषाढी वारीमध्ये सहभागी होणे अतिशय सुंदर अनुभूती आहे; महाराष्ट्राच्या या परंपरेतून असीमित ऊर्जा मिळते, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुका आणि श्री निवडुंगा विठोबाचे दर्शन घेतल्यानंतर व्यक्त केली. वारीत सहभागी झालेले वारकरी आणि शेतकऱ्यांना सुखी ठेव, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठुराया चरणी घातले. 

 

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार हेमंत रासणे, महापौर मंजुषा नागपूरे, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, पुणे शहरचे पोलीस सहआयुक्त संजय दराडे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. गणेश महाराज मोरे, ह.भ.प वैभव महाराज मोरे, ह.भ.प दिलीप महाराज मोरे, विश्वस्त ह.भ.प. विक्रमसिंह मोरे, ह.भ.प.उमेश महाराज मोरे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज मोरे, श्री निवडुंगा विठोबा देवस्थान संस्थानचे अध्यक्ष हिरालाल मालू, स्थानिक लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.

 

श्री. फडणवीस म्हणाले, संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री. तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद प्राप्त केलेला आहे. संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पुणे शहरातील पालखीच्या ठिकाणी असणाऱ्या अडीअडचणी पुणे महानगरपलिकेने योग्य पद्धतीने दूर केल्या आणि सुविधांचा विस्तार केला. पुढच्या वर्षी यामध्ये आणखीन विस्तार करण्यात येईल. 

 

वारकऱ्यांनी वारीचा आनंद घेत सुखरूप पंढरपूर येथे पोहचावे, असे आवाहन करुन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी ही वारी अतिशय सुखरुपपणे पूर्ण व्हावी, अशी प्रार्थना विठुरायाच्या चरणी केली.

 

टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात तल्लीन वारकरी.... 'ग्यानबा तुकाराम', 'माऊली, माऊली' चा गजर.... डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी... अशा भक्तिमय वातावरणात पुणे शहर दुमदुमले आहे. पंढरीच्या वारीसाठी मोठ्या संख्येने वारकरी पुणे शहरात दाखल झाले आहेत, उद्या सकाळी या पालखीच सोहळ्याचे लोणी काळभोरकडे प्रस्थान होणार आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती