युरोपमध्ये रस्ते, रुळ वितळले; इतिहासातील सर्वांत तीव्र उष्णतेची लाट, 'ओमेगा ब्लॉक'मुळे नागरिकांचे हाल! युरोपपासून अमेरिकेतील अनेक एआय डेंटा सेंटर्स उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर
xtreme2day
01-07-2026 21:01:57
403879684
युरोपमध्ये रस्ते, रुळ वितळले; इतिहासातील सर्वांत तीव्र उष्णतेची लाट, 'ओमेगा ब्लॉक'मुळे नागरिकांचे हाल! युरोपपासून अमेरिकेतील अनेक एआय डेंटा सेंटर्स उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर
लंडन (एजन्सी वार्ता) - युरोप आत्तापर्यंतच्या सर्वांत तीव्र उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहे. तीव्र उन्हामुळे रस्ते, ट्रामचे रुळ वितळत आहेत, तसेच हजारो लोकांना उकाड्याचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक युरोपीय देशांमध्ये तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. युरोपमध्ये रस्ते, रुळ वितळलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत. ही इतिहासातील सर्वांत तीव्र उष्णतेची लाट आहे. 'ओमेगा ब्लॉक'मुळे नागरिकांचे हाल होत असल्याने अनेक नागरिक मृत्युमुखी पडत आहेत. युरोपपासून अमेरिकेतील भीषण उष्णतेमुळे बड्या कंपन्यांची अनेक एआय डेंटा सेंटर्स उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत, 79 टक्के डेटा सेंटर्ससमोर ब्लॅकआऊटचं संकट उभ ठाकल आहे.
हवामान शास्त्रज्ञांच्या मते ओमेगा ब्लॉकमुळे तयार झालेल्या 'हीट डोम'मुळे उष्णता वाढली आहे. युरोप खंडावर एक उच्च दाबाचं क्षेत्र निर्माण होत आहे. यामुळे हवा खाली ढकलली जात आहे आणि ढगांची निर्मिती मंदावते. त्यामुळे सूर्य प्रकाश जमिनीवर अधिक काळ राहतो आणि तापमान अचानक वाढू लागतं. या घटनेला ओमेगा ब्लॉक असं म्हणतात. ओमेगा ब्लॉकचं नाव ग्रीक अक्षक Ω (ओमेगा) वरून पडलं आहे. कारण यावेळी हवेचा आकार या अक्षरासारखा होतो. दोन कमी दाबांच्या क्षेत्रामध्ये उच्च दाबाचं क्षेत्र अडकलेलं असतं. या उच्च दाबाच्या क्षेत्रामुळे जमिनीवरील गरम हवा वरती जाऊ शकत नाही आणि तिथेच अडकून राहते. त्यामुळे परिसरातील तापमान वाढू लागतं.
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, २१ जूनपासून युरोपमधील उच्च तापमानाशी संबंधित १,३००हून अधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. अनेक लहान मुलांचा बंद गाड्यांमध्ये मृत्यू झाला, तर उकाड्यापासून दिलासा मिळण्यासाठी जलाशयाच्या ठिकाणी पोहण्यासाठी गेलेल्या काही तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पॅरिसमध्ये उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत वाढ झाल्याने शवागृहे आणि स्मशानभूमींवर प्रचंड ताण आला आहे. फ्रान्समध्ये १८ जूनपासून किमान ७४ जणांचा बुडून मृत्यू झाला. आता येथे तापमान कमी होत आहे, मात्र जुलैमध्ये आणखी एक उष्णतेची लाट येण्याची शक्यता राष्ट्रीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
गेल्या आठवड्यात सर्वप्रथम पश्चिम युरोपला प्रचंड उष्णतेचा विळखा बसला. हा उष्मा अलीकडच्या काही दिवसांत पूर्वेकडे सरकला. पोलंड, चेक रिपब्लिक आणि जर्मनीमध्ये उच्चांकी तापमान नोंदवले गेले. जर्मनीमध्ये तापमान ४१ अंश सेल्सिअसच्या वर गेले, तर चेक रिपब्लिकमध्ये ते ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडून गेले. स्वित्झर्लंडमधील बासेलमध्ये तापमान ३८. ८ अंश सेल्सिअस या विक्रमी पातळीच्या वर गेले. त्याच वेळी डेन्मार्कने १८७४पासूनचा सर्वांत उष्ण दिवस अनुभवला. यूकेमध्येही जून महिन्यातील आत्तापर्यंतचा सर्वांत उष्ण दिवस नोंदवला गेला.
युरोपपासून अमेरिकेतील भीषण उष्णतेमुळे बड्या कंपन्यांची अनेक एआय डेंटा सेंटर्स उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर; AI चा गेम ओव्हर! 79 टक्के डेटा सेंटर्ससमोर ब्लॅकआऊटचं संकट
भीषण उष्णतेमुळे युरोपपासून अमेरिकेतील कोट्यवधी लोक त्रासले आहेत. पण उष्णतेमुळे केवळ माणूसच नव्हे, तर एआय च्याही अडचणी वाढल्या आहेत. भीषण उष्णतेमुळे बड्या कंपन्यांची अनेक एआय डेंटा सेंटर्स उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. या सेंटर्सना थंडगार ठेवण्याचं आव्हान कंपन्यांसमोर आहे. उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि एनवीडिया यासारख्या कंपन्यांनी डेटा सेंटरच्या डिझाईनमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. डेटा सेंटर्स प्रत्येक ऋतूत थंड ठेवण्यासाठी या कंपन्या कामाला लागल्या आहेत. वाढलेला उकाडा आणि वातावरणात होणारे बदल यामुळे एआय डेटा सेंटर उभारणाऱ्या कंपन्यांचा खर्च कैकपटीनं वाढला आहे. एआय डेटा सेंटर्समध्ये अतिशय शक्तिशाली चिपचा वापर होतो. त्या चिप थंड ठेवणं हे मोठं आव्हान आहे. डेटा सेंटर्स कित्येक लाख लीटर पाणी पितात. डेटा सेंटर्स थंड राहिल्यास ती भस्मसात होऊ शकतात. कारण सेंटर्समध्ये वापरल्या जाणाऱ्या चिप अतिशय वेगानं गरम होतात. त्यांना कार्यान्वित ठेवण्यासाठी प्रचंड प्रमाणात वीज लागते. एका डेटा सेंटरला लागणारी वीज लाखो घरांमध्ये लागणाऱ्या वीजेइतकी आहे. त्यामुळे भीषण उकाड्यामुळे ब्लॅकआऊटचं संकट निर्माण होण्याचा धोका आहे. डेटा सेंटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या विजेचा ४० टक्के भाग केवळ चिप्स थंड ठेवण्यासाठी उपयोगात आणला जातो. वाढतं तापमान, हवामान बदल यामुळे डेटा सेंटर्सची विजेची मागणी वाढली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शहरी भागांमध्येही विजेची मागणी वाढते. त्यामुळे पॉवरग्रिडकडे डेटा सेंटर्ससाठी पुरेशी वीज शिल्लक राहत नाही.काही दिवसांपूर्वीच इटलीच्या ट्युरिन शहरात तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं. त्यामुळे जमिनीखाली टाकण्यात आलेल्या केबल गरम झाल्या. अनेकदा ब्लॅकआऊट झालं. वाढलेल्या उकाड्यामुळे विजेची मागणी कैकपटीनं वाढली आहे. त्यामुळे डेटा सेंटर्सला पुरेसा विद्युत पुरवठा होत नाही.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.