अंतर्गत बंडाळी, निवडणुकांमधील दारुण पराभव आणि जगातील सर्वात मोठ्या लैंगिक गुन्हेगाराशी अप्रत्यक्षपणे जोडले गेलेले नाव, यामुळे ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचा राजीनामा
xtreme2day
22-06-2026 20:25:14
193820659
अंतर्गत बंडाळी, निवडणुकांमधील दारुण पराभव आणि जगातील सर्वात मोठ्या लैंगिक गुन्हेगाराशी अप्रत्यक्षपणे जोडले गेलेले नाव, यामुळे ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचा राजीनामा
नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी राजीनामा दिला आहे. देशातील राजकीय अस्थिरतेचा अंत करण्याचे आश्वासन देत कीर स्टार्मर ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. पण, स्टार्मर यांना अवघ्या दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. सोमवारी एका अत्यंत भावूक पत्रकार परिषदेत त्यांनी मजूर पक्षाच्या (लेबर पार्टी) नेतेपदाचा राजीनामा जाहीर केला. अंतर्गत बंडाळी, निवडणुकांमधील दारुण पराभव आणि एका चुकीच्या नियुक्तीमुळे थेट जगातील सर्वात मोठ्या लैंगिक गुन्हेगाराशी अप्रत्यक्षपणे जोडले गेलेले नाव, यामुळे अखेर स्टार्मर यांची खुर्ची गेली आहे.
कीर स्टार्मर यांच्या राजीनाम्यामागचे सर्वात मोठे कारण पीटर मँडेलसन यांची अमेरिकेत ब्रिटनचे राजदूत म्हणून केलेली नियुक्ती ठरली. मँडेलसन यांचे जगातील सर्वात श्रीमंत लोकांसोबत चांगले संबंध होते, पण नंतर समोर आलेल्या धक्कादायक कागदपत्रांमुळे ब्रिटनच्या राजकारणात भूकंप झाला. मैंडेलसन हे जगातील सर्वात मोठ्या लैंगिक गुन्हेगारांपैकी एक असलेल्या जेफ्री एपस्टीनचे सर्वात जवळचे मित्र असल्याचे उघड झाले 2008 साली एपस्टीन अल्पवयीन मुलांशी संबंधित लैंगिक गुन्ह्यात दोषी आढळल्यानंतरही मैंडेलसन त्याच्या संपर्कात होते. जानेवारी 2026 मध्ये समोर आलेल्या ईमेल्सवरून स्पष्ट झाले की, मैंडेलसन यांनी सरकारी पदाचा गैरवापर करत अत्यंत संवेदनशील माहिती एपस्टीनला दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी मैंडेलसन यांना अटक करून त्यांची चौकशीही केली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, सिक्युरिटी क्लिअरन्समध्ये नापास होऊनही स्टार्मर यांनी मैंडेलसन यांना इतक्या मोठ्या पदावर बसवले होते. यावरून लेबर पार्टीच्या खासदारांनी स्टार्मर यांच्या निर्णयक्षमतेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले, ज्यासाठी नंतर स्टार्मर यांना जाहीर माफी मागावी लागली.
पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी 5 जुलै 2024 रोजी ब्रिटनची सत्ता हाती घेतली होती. त्यांच्या पक्षाने 650 पैकी 411 जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवले होते. मात्र, त्यांचे विरोधक नेहमीच त्यांचा उल्लेख 'लंडनचे एलिट वकील' असा करायचे. वयाच्या 50 व्या वर्षी राजकारणात आलेल्या स्टार्मर यांच्याकडे राजकीय डावपेचांची कमतरता असल्याचे बोलले जाते. सुरुवातीला मोफत भेटवस्तू घेण्याचा वाद आणि नंतर कल्याणकारी योजनांमधील कपात यामुळे त्यांच्याच पक्षात प्रचंड नाराजी पसरली होती. या वर्षभरात स्टार्मर यांच्या अडचणी सातत्याने वाढत गेल्या. मे महिन्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लेबर पार्टीला संपूर्ण इंग्लंडमध्ये तब्बल 1,100 पेक्षा जास्त कौन्सिल जागा गमावाव्या लागल्या. या मोठ्या पराभवानंतर पक्षातील 80 पेक्षा जास्त खासदारांनी स्टार्मर यांच्या राजीनाम्याची मागणी केली. 14 मे रोजी आरोग्य मंत्री वेस स्ट्रीटिंग यांनी आणि त्यानंतर जूनमध्ये संरक्षण मंत्री जॉन हीली यांनी स्टार्मर यांच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवत आपल्या पदांचे राजीनामे दिले.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.