Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 नॅशनल न्यूज

प्रशांत महासागरात 'एल निनो' सक्रिय; डिसेंबरमध्ये गाठणार अतितीव्र पातळी, भारतीय मान्सूनवर होणार गंभीर परिणाम

xtreme2day   12-06-2026 20:37:58   148036068

प्रशांत महासागरात 'एल निनो' सक्रिय; डिसेंबरमध्ये गाठणार अतितीव्र पातळी, भारतीय मान्सूनवर होणार गंभीर परिणाम

 

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - भारतात चालू वर्षाच्या मान्सूनचे आगमन होत असतानाच दुसरीकडे एल निनो सक्रिय होणे ही देशाच्या एकूण पावसासाठी अत्यंत चिंताजनक बाब मानली जात आहे. मॉन्सूनची पुढील प्रगती आणि संपूर्ण हंगामातील पावसाचे प्रमाण यावर आता थेट एल निनोचा नकारात्मक प्रभाव पडणार हे स्पष्ट झाले आहे. यामुळे देशातील काही भागांत पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान, प्रशांत महासागरात 'एल निनो' सक्रिय झाल्याची अधिकृत घोषणा अमेरिकेच्या 'क्लायमेट प्रेडिक्शन सेंटर'ने केली आहे. हा एल निनो डिसेंबर महिन्यापर्यंत अतितीव्र पातळी गाठणार असून, 1950 नंतरचा हा सर्वात तीव्र एल निनो असण्याची शक्यता 63 टक्के आहे.

 

विषुववृत्तीय प्रशांत महासागराचे तापमान सरासरीपेक्षा अधिक वाढल्यामुळे तिथे आता 'एल निनो'ची स्थिती पूर्णपणे सक्रिय झाली आहे. अमेरिकेची नामांकित हवामानशास्त्र संस्था 'नोआ' (NOAA) च्या 'क्लायमेट प्रेडिक्शन सेंटर'ने (CPC) गुरुवारी यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली आहे. यामुळे महासागरातील 'न्यूट्रल' म्हणजेच तटस्थ स्थिती आता संपुष्टात आली आहे. हा एल निनो आगामी काळात अधिक मजबूत होत जाईल आणि डिसेंबर 2026 पर्यंत तो 'अतितीव्र पातळी गाठेल. हवामान शास्त्रज्ञांच्या मते, हा एल निनो ऐतिहासिक ठरू शकतो. वर्ष 1950 पासून नोंदवल्या गेलेल्या हवामानाच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली आणि तीव्र एल निनो असण्याची शक्यता 63 टक्के इतकी जास्त आहे. या एल निनोच्या प्रभावामुळे पाठोपाठ येणारा 2027 चा उन्हाळा कमालीचा तीव्र असेल. देशात उष्णतेच्या लाटांची संख्या आणि तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढेल. एवढेच नव्हे तर, या स्थितीमुळे पुढील वर्षाच्या म्हणजेच 2027 च्या मॉन्सूनचे भारतातील आगमन देखील नेहमीपेक्षा उशिराने होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

 

नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ प्रवीण कुमार यांनी सांगितले की, आता अल निनो सक्रिय झालेला आहे मात्र तो कमजोर आहे, जसजसा मानसूनचा पाऊस यायला सुरुवात होईल त्यानुसार तो सुद्धा ऍक्टिव्ह होत जाईल. पावसाच्या महिन्यांमध्ये म्हणजेच सप्टेंबरच्या आसपास जेव्हा जास्त पाऊस असतो, त्यावेळी मोठ्या प्रमाणात अल निनो सक्रिय होईल आणि त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होईल. मान्सूनच्या शेवटपर्यंत अल निनोचा प्रभाव कायम असेल. इंडियन ओशियन डायफॉल हा सुद्धा फर्स्ट फेजमध्ये आहे. इंडियन ओशन डायफॉल आणि अलनिनो हे दोन्ही असल्यामुळे भारतासोबतच विदर्भात सुद्धा पावसाची संभावना कमी होत आहे. यामुळे संपूर्ण मानसूनमध्ये पाऊस जो आहे तो 94% पर्यंत येण्याचा अंदाज आहे. मध्यंतरीच्या काळात काहीसा चांगला पाऊस पडू शकतो, मात्र एमजे आणि अलनिनो यामुळे मान्सून जास्त सक्रिय होत नाही. अल निनोची प्रक्रिया ही साऊथ अमेरिकेच्या समुद्रामध्ये होत असते, तिथलं समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्य पेक्षा जास्त होते, त्यामुळे अल निनो तयार होतो आणि याचा पावसावर परिणाम होतो. दोन ते सात वर्षांमध्ये अल निनो त्याचा प्रभाव दाखवत असतो. आतापर्यंतचा डाटा बघितला तर जेव्हा जेव्हा अल निनो आला तेव्हा तेव्हा पावसाचे प्रमाण कमी असल्याचे पाहायला मिळालं. असंही त्यांनी सांगितलं.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
💰 TRON Crypto Refund 2026 Available Today 💥💥 telegra.ph/COMPENSATION-05-12-9?hs=70c99bcba04e648a4f8f24280272c621& 💰 12-06-2026 20:52:15

rksbw8


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती