Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 वर्ल्ड न्यूज

इराणसाठी आज काळरात्र; काऊंट डाऊन सुरू, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या घोषणेमुळे जगभरात मोठी खळबळ!

xtreme2day   11-06-2026 21:26:07   257143822

इराणसाठी आज काळरात्र; काऊंट डाऊन सुरू, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या घोषणेमुळे जगभरात मोठी खळबळ! 

 

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - इराणकडून अमेरिकेच्या तब्बल 22 सैन्य तळांवर भीषण ड्रोन आणि मिसाईल हल्ले करण्यात आले होते. अमेरिकेच्या जॉर्डन स्थित सैन्य तळावर देखील इराणकडून हल्ला करण्यात आला. दरम्यान या हल्ल्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. 11 जूनला रात्री आम्ही इराणवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान हल्ल्याच्या काही तास आधीच डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ही पोष्ट करण्यात आल्यानं जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.

 

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, अमेरिका 11 जूनच्या रात्री इराणवर जबरदस्त हल्ला करेल. इराणकडे असलेले एअर क्राफ्ट, मिसाईल, सैन्यदल नौदल, एअर फोर्स, रडार असं सर्व काही नष्ट झालं आहे. त्यामुळे लवकरच आम्ही आता इराणमधील खर्ग आयरलँडचा ताब्यात घेऊ. खर्ग आयरलँडवर ताबा मिळवल्यानंतर तेथील सर्व प्रकारच्या उत्पादनावर आमचं नियंत्रण असेल आम्हीच तेथील कच्चं तेल आणि एलपीजी गॅसचे बाजार दर नियंत्रित करू असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. ज्या पद्धतीने आम्ही व्हेनेझुएला ताब्यात घेतलं त्याच पद्धतीने आम्ही आता इराणमधील खर्ग आयरलँड देखील ताब्यात घेऊ, असं देखील ट्रम्प यांनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

होर्मुज खाडीत तणाव वाढला आहे. इराणवर अमेरिकेने हल्ला केला. हेच नाही तर अजूनही मोठे हल्ले करण्याचे आदेश आहेत. अमेरिकी लष्कराचे हेलिकॉप्टर इराणने पाडल्याचे आरोप करत अमेरिकेने हल्ला केला. मात्र, खोटी आरोप करून अमेरिका हल्ला करत असल्याचे थेट इराणने म्हटले. इराणने देखील अमेरिकेच्या लष्कर तळांवर हल्ले केले. यादरम्यानच जगाची झोप उडवणारा निर्णय नुकताच इराणकडून घेण्यात आला. इराणने थेट होर्मुज खाडी बंद केली. अमेरिकेच्या तटबंदीनंतर इराण इतर देशांच्या जहाजांना सुरक्षित मार्ग देत होता. होर्मुज खाडीतून कमी प्रमाणात का होय ना जहाज ये-जा करत होते. भारतात त्याच मार्गे कच्चे तेल दाखल होत होते. मात्र, अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर त्यांनी होर्मुज खाडी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. जगातील सर्वात महत्वाच्या जलमार्गापैकी एक असलेला होर्मुज मार्ग सध्याच्या घडीला पूर्णपणे बंद आहे. ज्यामुळे भारतावर पुन्हा एकदा संकट येऊ शकते. दुसरीकडे इराण देखील अमेरिकेच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देत आहे. बुधवारीच इराणने अमेरिकेच्या 22 सैन्य तळांवर हल्ले केले आहेत. दरम्यान अमेरिकेनं आपली हीच भूमिका कायम ठेवली तर मात्र हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. युद्ध आणखी पेटू शकतं. आधीच मध्य पूर्वेत मोठा तणाव आहे. त्यातच आता अमेरिकेनं जर इराणवर हल्ला केला तर याचे परिणाम गंभीर होऊ शकतात. त्यामुळे आज ट्रम्प हे खरच इराणवर हल्ला करणार का? याकडे आता जगाचं लक्ष लागलं आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती