xtreme2day 27-05-2026 20:35:12 468821622
SIR वर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, निवडणूक आयोगाला मोठा दिलासा, एसआयआर सुरूच राहणार नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - सुप्रीम कोर्टाने बुधवारी (२७ मे) बिहारमध्ये सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकन (Special Intensive Revision - SIR) प्रक्रियेला वैध ठरवत निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India) अधिकारांना मान्यता दिली. मुख्य न्यायमूर्ती Surya Kant यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्पष्ट केले की, मतदार यादी पुनरावलोकनाची ही प्रक्रिया नेहमीच्या पद्धतीपेक्षा वेगळी असली तरी ती बेकायदेशीर ठरत नाही. न्यायालयाने म्हटले की, SIR ही प्रक्रिया संविधानसंगत असून मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी तिचा थेट संबंध आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि मतदार यादीची अचूकता राखण्यासाठी Election Commission of India ला अशा प्रकारचे विशेष पुनरावलोकन करण्याचा अधिकार आहे. या निर्णयामुळे बिहारमधील मतदार यादी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेला मोठा कायदेशीर आधार मिळाला असून, भविष्यात इतर राज्यांमध्येही अशा विशेष पुनरावलोकन मोहिमा राबविण्याचा मार्ग अधिक स्पष्ट झाला आहे.