Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 नॅशनल न्यूज

नीट परीक्षेची नवी तारीख जाहीर; NTA कडून घोषणा; २१ जून रोजी नीटची परीक्षा होणार

xtreme2day   15-05-2026 21:53:30   228432282

नीट परीक्षेची नवी तारीख जाहीर; NTA कडून घोषणा; २१ जून रोजी नीटची परीक्षा होणार

 

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - NTA ने 3 मे 2026 रोजी घेण्यात आलेली NEET (UG) 2026 परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला होता. पेपर फुटीमुळे ही नीट परीक्षा रद्द कऱण्यात आली होती. आता नीट परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. २१ जून रोजी नीटची परीक्षा होणार आहे. काल केंद्रीय मंत्र्यांची बैठक झाल्यानंतर हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा - पदवी (NEET UG) २०२६ च्या पुनर्परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ही परीक्षा २१ जून २०२६ रोजी संपूर्ण भारतात पुन्हा घेतली जात आहे. नीट पेपरफुटीमुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. नीट यूजी पुनर्परीक्षेसंदर्भात गुरुवारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या निवासस्थानी एक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या आयोजनाशी संबंधित विविध पैलूंवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला सचिव (उच्च शिक्षण) विनीत जोशी, सचिव (शालेय शिक्षण) संजय कुमार, नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे (NTA) महासंचालक अभिषेक सिंह, सीबीएसईचे अध्यक्ष राहुल सिंह, तसेच केंद्रीय विद्यालय संघटन (KVS) आणि नवोदय विद्यालय समितीचे (NVS) आयुक्त यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.३ मे रोजी झालेल्या या परीक्षेला २२ लाखांहून अधिक उमेदवार बसले होते. परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला होता. 

 

दरम्यान, सुधारित परीक्षा वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना देशभरातील एमबीबीएस, बीडीएस आणि संबंधित वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नव्याने स्पर्धा करण्याची आणखी एक संधी मिळण्याची अपेक्षा आहे. यापूर्वीची नीट (NEET) परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थी आणि पालक स्पष्टतेची आतुरतेने वाट पाहत होते. अनेक विद्यार्थ्यांनी तणाव, अनिश्चितता आणि कमी कालावधीत पुन्हा तयारी करण्याच्या दबावाबद्दल चिंता व्यक्त केली होती.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती