xtreme2day 15-05-2026 21:49:00 196327599
NEET पेपर लीक प्रकरणी पुण्यातील मास्टरमाइंड केमिस्ट्री प्राध्यापकाला सीबीआयने घेतले ताब्यात; नाशिकच्या शुभम खैरनारलाही पोलिसांनी केली अटक पुणे (क्राईम रिपोर्टर) - वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या NEET-UG 2026 परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई करत पुण्यातील केमिस्ट्री प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांना अटक केली आहे. सीबीआयने त्यांना या रॅकेटचा “किंगपिन” असल्याचा दावा केला आहे. सीबीआयच्या माहितीनुसार, कुलकर्णी हे राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) यांच्या परीक्षा प्रक्रियेशी संबंधित होते. त्यामुळे त्यांना NEET-UG 2026 च्या प्रश्नपत्रिकेपर्यंत प्रवेश मिळाला होता. त्यांनी पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी गुप्त शिकवणी वर्ग आयोजित करून विद्यार्थ्यांना प्रश्न, पर्याय आणि योग्य उत्तरे सांगितल्याचा आरोप आहे. विद्यार्थ्यांनी वहीत लिहून घेतलेले प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्नांशी तंतोतंत जुळल्याचे सीबीआयने म्हटले आहे. या प्रकरणात कुलकर्णी यांच्यासह आणखी काही आरोपींना अटक करण्यात आली असून आतापर्यंत सात जणांना अटक झाल्याची माहिती समोर आली आहे. तपासात ‘इनसाइडर नेटवर्क’ आणि परीक्षा प्रक्रियेत सहभागी इतर व्यक्तींच्या भूमिकेचाही तपास सुरू आहे. ३ मे रोजी झालेल्या NEET-UG 2026 परीक्षेला देशभरातून सुमारे २२ लाख विद्यार्थी बसले होते. पेपरफुटीच्या आरोपांनंतर १२ मे रोजी NTA ने परीक्षा रद्द केली होती. वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नीट परीक्षा यंदा पेपर लीक प्रकरणामुळे देशभरात चर्चेत; या प्रकरणाचे धागेदोरे आता नाशिकपर्यंत पोहोचले असून एका मेडिकल विद्यार्थ्याला तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे. NEET पेपर लीक प्रकरणी नाशिकच्या शुभम खैरनार ला पोलिसांनी घेतले ताब्यात; नातेवाईक आणि कुटुंबाची ही चौकशी सुरू केली आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून या रॅकेटचे कनेक्शन थेट मध्य प्रदेशपर्यंत पोहोचले आहे.