Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 स्पेशल स्टोरी

देशाच्या ऊर्जा सुरक्षेच्या आणि हरित ऊर्जेच्या भविष्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल; भारताने ऊर्जा क्षेत्रात मोठे काम केले आणि त्यात प्रचंड यश मिळवले

xtreme2day   23-04-2026 20:46:37   298034579

देशाच्या ऊर्जा सुरक्षेच्या आणि हरित ऊर्जेच्या भविष्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल; भारताने ऊर्जा क्षेत्रात मोठे काम केले आणि त्यात प्रचंड यश मिळवले

 

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - संपूर्ण जग ऊर्जेचा संकटात असताना भारताला याचा काहीही फटका बसत नाहीये. सौर ऊर्जेद्वारे विक्रमी ऊर्जा उत्पादन साध्य झाले. भारताने सौर ऊर्जेद्वारे 45 गिगावॅट वीज निर्माण केली. भारताने पवन ऊर्जा क्षेत्रातही प्रचंड यश मिळवले आहे. भारताने पुन्हा एकदा जगाला दाखवले की, आपली ताकद नक्की काय आहे. मागील काही वर्षांचा विचार करता भारताने ऊर्जा क्षेत्रात मोठे काम केले आणि त्यात यशही मोठे मिळाले. एलपीजीचे टेन्शन जगात असताना आता भारताच्या प्रत्येक घरात चूल पेटत राहील.  भारताने 2025-26 दरम्यान पवन ऊर्जा क्षमतेत विक्रमी 6.1 गिगावॅट (GW) ची वाढ नोंदवून स्वच्छ ऊर्जेमध्ये एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.

 

 

जगातील जे कोणत्याही देशाला जमले नाही ते भारताने नक्कीच करून दाखवले आहे. या क्षेत्रातील प्रचंड क्षमतेवर भर देताना 150 मीटर उंचीच्या हबवर भारताची पवन ऊर्जा क्षमता अंदाजे 1,164 गिगावॅट आहे, जी देशाला ऊर्जा उत्पादनात आत्मनिर्भर बनवण्यात मोठी भूमिका बजावते. जर प्रयत्नांची सध्याची गती कायम राहिली तर भारत 2030 पर्यंत 100 गिगावॅट आणि 2036 पर्यंत 156 गिगावॅट पवन ऊर्जा क्षमता गाठू शकतो. इराण आणि अमेरिका युद्धात जागतिक ऊर्जेचे संकट वाढत आहे. अनेक देशांमध्ये ऊर्जा नसल्याने संकट आहे. मात्र, याला भारत अपवाद ठरला आहे. भारत गेल्या काही वर्षांपासून मिशन मोडमध्ये नवीकरणीय ऊर्जेवर काम करत आहे.  त्याचेच हे परिणाम आहेत. 

 

 

केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, ही आतापर्यंतची सर्वात मोठी वार्षिक वाढ आहे. देशाच्या ऊर्जा सुरक्षेच्या आणि हरित ऊर्जेच्या भविष्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. भारताला कोणावही अवलंबून राहण्याची अजिबात गरज नाही. उलट भारत या युद्धाच्या परिस्थितीमध्ये बांगलादेशची मदत करित आहे  असेही ते म्हणाले.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती