Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 नॅशनल न्यूज

महिला आरक्षण विधेयकामुळे देशाच्या राजकारणाची “दिशा आणि दशा” बदलण्यास मदत होईल - पंतप्रधान नरेंद्र मोदी

xtreme2day   16-04-2026 21:20:04   216372790

महिला आरक्षण विधेयकामुळे देशाच्या राजकारणाची “दिशा आणि दशा” बदलण्यास मदत होईल - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - देशाच्या राजकारणाला नवी दिशा देण्याची आणि लोकशाही अधिक बळकट करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे, हे आपले भाग्य आहे, महिला आरक्षण विधेयकामुळे देशाच्या राजकारणाची “दिशा आणि दशा” बदलण्यास मदत होईल. देशाच्या अर्ध्या लोकसंख्येला निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेतल्याने लोकशाही अधिक बळकट होईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत म्हणाले. तसेच, या मुद्द्याकडे केवळ राजकारणाच्या दृष्टीकोनातून न पाहता, राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने पाहावे, असे आवाहनही त्यांनी सर्व पक्षांना केले.

 

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचनेवरील विशेष तीन दिवसीय अधिवेशनात भाषण केले. यावेळी त्यांनी तीव्र राजकीय संदेश देत असे इशारा दिला की, महिलांना अधिकार देण्याला विरोध करणाऱ्यांना इतिहासात निवडणुकीत परिणाम भोगावे लागले आहेत. यापूर्वीच्या निवडणूक प्रवाहांचा दाखला देत सांगितले की, महिला मतदार अशा विरोधाला “माफ” करत नाहीत.

“आपल्या देशात महिला आरक्षणाबाबत चर्चा सुरू झाल्यापासून आणि त्यानंतर प्रत्येक निवडणुकीच्या वेळी, ज्यांनी महिलांना हा हक्क देण्यास विरोध केला, त्यांना महिलांनी कधीही माफ केलेले नाही,” असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले.

 

केंद्र सरकार संसदेत तीन महत्त्वाची विधेयके सादर करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये विधिमंडळांमध्ये ३३% महिला आरक्षण, मतदारसंघ पुनर्रचना (delimitation) आणि केंद्रशासित प्रदेशांमधील जागा वाढवण्याचे प्रस्ताव यांचा समावेश आहे. हे सुधार २०२९ च्या Lok Sabha निवडणुकांपूर्वी लागू करण्याचे उद्दिष्ट आहे. या बदलांमुळे भारताचा निवडणूक नकाशा आणि राजकीय प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षण विधेयकावरील आपल्या भाषणाचा शेवट एका तीक्ष्ण आणि प्रतीकात्मक टिप्पणीने केला.विरोधी पक्षांच्या सदस्यांचे आभार मानताना त्यांनी हा संदर्भ “नजर लागू नये म्हणून लावल्या जाणाऱ्या काळ्या टिक्या”शी जोडला. डीएमकेच्या खासदारांनी निषेध म्हणून काळे कपडे परिधान केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सूचक टोला लगावला. “आपल्याकडे एखादे चांगले काम करताना त्याला नजर लागू नये म्हणून काळा टीका लावतात… त्यासाठी मी तुमचे आभार मानतो,” असे म्हणत त्यांनी विरोधकांच्या आंदोलनाला व्यंगात्मक स्वरूपात प्रत्युत्तर दिले.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती