युद्धामुळे मध्य पूर्वेत प्रचंड तणाव असतानाच इस्त्रालयने भारतासाठी मोठी घोषणा केली, एआय ऑपरेटेड ड्रोनसाठी केला करार, चीन आणि पाकिस्तानला मोठा धक्का
xtreme2day
20-03-2026 21:15:23
376251759
युद्धामुळे मध्य पूर्वेत प्रचंड तणाव असतानाच इस्त्रालयने भारतासाठी मोठी घोषणा केली, एआय ऑपरेटेड ड्रोनसाठी केला करार, चीन आणि पाकिस्तानला मोठा धक्का
नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - मध्य पूर्वेत विमानाचा भडका उडाला असतानाच आता भारतासाठी मोठी बातमी समोर आली आहे. इस्त्रालयने भारतासोबत मोठी डील केली असून, या डीलमुळे पाकिस्तान आणि चीनला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भारतासाठी एक मोठा संरक्षण क्षेत्रातील करार आहे. या करारातंर्गत जे ड्रोन तयार होणार आहेत, ते AI ऑपरेट असणार आहेत.
इस्त्रायलची AI रोबोटिक्स कंपनी XTEND ने भारताची कंपनी Rayonix Tech सोबत तब्बल 11 मिलियन डॉलरचा मोठा करार केला आहे. या करारातंर्गत या दोन्ही कंपन्या मिळून स्थानिक पातळीवर अनमॅन्ड एरिअल व्हेकल्स (UAVs) चं उत्पादन करणार आहेत. हा भारतासाठी एक मोठा संरक्षण क्षेत्रातील करार आहे. कारण या करारातंर्गत जे ड्रोन तयार होणार आहेत, ते AI ऑपरेट करणार आहेत. टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या एका वृत्तानुसार Rayonix ही कंपनी भारतात XTEND या इस्त्रायलच्या कंपनीची पार्टनर असणार आहे. भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल आहे. त्यामुळे या डीलचा मोठा फायदा हा भारताला होणार आहेत. आता या करारातंर्गत भारतामध्येच जगातील सर्वात घातक ड्रोन बनवले जाणार आहेत. ज्या ड्रोनला एआय ऑपरेट करणार आहे.
दरम्यान, इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर अनेक जहाजं हे तिथेच अडकून पडल्यानं अनेक देशांमध्ये गॅस, पेट्रोल, डिझेलचा प्रचंड प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. मात्र या सर्व पार्श्वभूमीवर भारतासाठी काही दिलासादायक घटना घडताना दिसत आहेत, त्यामुळे भारतामध्ये आता लवकरच इंधन टंचाईची समस्या दूर होण्याची शक्यता आहे. इराणने आपल्या काही मित्र राष्ट्रांसाठी स्ट्रेट ऑफ होर्मूज पुन्हा एकदा सुरू केला आहे, त्यामध्ये भारताचा देखील समावेश आहे. त्यामुळे या मार्गाने भारतात कच्चं तेल आणि नॅचरल गॅस येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर दुसरीकडे आता रशिया देखील भारताच्या मदतीला धावून आला आहे. रशियानं मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे कच्च्या तेलाच्या विक्रीसाठी भारतालाच प्राथमिकता दिली जात आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.