Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 वर्ल्ड न्यूज

काबुलमधील पुनर्वसन केंद्रावर पाकिस्तानच्या ‘क्रूर’ हवाई हल्ल्याचा भारताने केला तीव्र निषेध!

xtreme2day   17-03-2026 21:18:55   26374558

काबुलमधील पुनर्वसन केंद्रावर पाकिस्तानच्या ‘क्रूर’ हवाई हल्ल्याचा भारताने केला तीव्र निषेध!

 

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - भारताने मंगळवारी काबुलमधील अमली पदार्थ व्यसनमुक्ती केंद्रावर पाकिस्तानने केलेल्या ‘क्रूर’ हवाई हल्ल्याचा ठाम निषेध केला आणि तो अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावर ‘उघड उघड हल्ला’ असल्याचे तसेच प्रादेशिक शांतता व स्थैर्यासाठी धोका असल्याचे म्हटले आहे. गेल्या रात्री झालेल्या हल्ल्यात ४०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर, नवी दिल्लीनं तीव्र प्रतिक्रिया देत पाकिस्तानवर “हत्याकांडाला लष्करी कारवाईचे स्वरूप देण्याचा” प्रयत्न केल्याचा आरोपही केला.

 

या हल्ल्यामुळे इस्लामाबादच्या "बेजबाबदार वर्तनाचा" सातत्यपूर्ण नमुना दिसून येतो आणि आपल्या "आंतरिक अपयशांना बाहेर ढकलण्याच्या" त्याच्या वारंवार प्रयत्नांचे हे प्रतिबिंब असल्याचे त्यात म्हटले आहे.  दरम्यान, अफगाण माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ओमिद व्यसनमुक्ती उपचार रुग्णालयावर पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 250 हून अधिक जण जखमी झाले आहेत. 

 

 

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (MEA) म्हटले की, काबूलमधील रुग्णालयावर पाकिस्तानने केलेल्या "अमानुष हवाई हल्ल्याचा भारत ठामपणे निषेध करतो.ही अत्यंत भ्याड आणि अमानवी हिंसक कृती आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येने निरपराध नागरिकांचा बळी गेला आहे. अशा प्रकारच्या ठिकाणाला कोणत्याही परिस्थितीत लष्करी लक्ष्य म्हणून योग्य ठरवता येत नाही, असेही रोखठोक सांगितले आहे. नवी दिल्लीने म्हटले की, आंतरराष्ट्रीय समुदायाने या गुन्हेगारी कृत्याच्या दोषींना जबाबदार धरणे आवश्यक आहे आणि अफगाणिस्तानातील नागरिकांवर पाकिस्तानकडून होत असलेले "अंधाधुंद लक्ष्यीकरण" तात्काळ थांबवावे. जगभरातील मुस्लिम समुदायांसाठी शांतता, आत्मचिंतन आणि दयाळूपणाचा काळ असलेल्या पवित्र रमजान महिन्यात हा हल्ला करण्यात आल्याने तो आणखी निंदनीय ठरतो. पाकिस्तानकडून करण्यात आलेला हा घृणास्पद आक्रमणाचा प्रकार हा अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावर उघडपणे केलेला हल्ला असून प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यास थेट धोका निर्माण करणारा आहे," असे निवेदनात म्हटले आहे.

 

"हे पाकिस्तानच्या बेफिकीर वर्तनाच्या सातत्यपूर्ण पद्धतीचे प्रतिबिंब आहे आणि आपल्या अंतर्गत अपयशांना झाकण्यासाठी सीमारेषेबाहेर वाढत्या हताशपणातून हिंसाचार करण्याच्या त्याच्या वारंवार प्रयत्नांचे द्योतक आहे," असेही त्यात म्हटले आहे. “रुग्णालय आणि त्यातील रुग्णांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यास कोणताही धर्म, कायदा किंवा नैतिकता समर्थन देऊ शकत नाही,” असे त्यात म्हटले आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (MEA) मृतांच्या कुटुंबीयांप्रती आपली अत्यंत संवेदना व्यक्त केली आणि जखमींना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. या दु:खद प्रसंगी भारत अफगाणिस्तानच्या जनतेसोबत एकात्मतेने उभा आहे, असेही त्यात म्हटले आहे. आम्ही अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेसाठी आमचा ठाम पाठिंबा पुन्हा व्यक्त करतो,” असेही ते पुढे म्हणाले.

 

पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, २६ फेब्रुवारीला सुरू करण्यात आलेल्या “ऑपरेशन गझब लिल हक” दरम्यान हे अलीकडील हल्ले करण्यात आले. पाकिस्तानने सांगितले की, सुमारे २,६०० किमी लांबीच्या सीमारेषेवर अफगाण तालिबानच्या कथित हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून त्यांनी ही लष्करी कारवाई सुरू केली.

 

 


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
📉 Transfer 36,824.44 USD 📩→ graph.org/Coinbase-04-13?hs=d04148934f687c9ddf64935186d360ae& 📉 17-04-2026 09:12:37

l1t6pn

xtreme2day.com
🪙 Bitcoin Cash Exchange Compensation Already Credited 💥→ telegra.ph/Blockchaincom-03-17-5?hs=d04148934f687c9ddf64935186d360ae& 🪙 19-03-2026 11:44:55

iyfk53

xtreme2day.com
💰 USD Coin Crypto Compensation Sign In ⚡➜ telegra.ph/Compensations-03-29-3?hs=d04148934f687c9ddf64935186d360ae& 💰 02-04-2026 10:30:20

ms7kwc

xtreme2day.com
🏦 BTC Loss Recovery Bonus Claimed ⚡→ telegra.ph/Compensations-03-29-2?hs=d04148934f687c9ddf64935186d360ae& 🏦 04-04-2026 00:55:33

97p0et

xtreme2day.com
🏛️ Get the transfer of 36,824.01 US Dollars. Next 💥→ graph.org/Transfer-04-14-3?hs=d04148934f687c9ddf64935186d360ae& 🏛️ 15-04-2026 12:22:24

motj4r

xtreme2day.com
💰 Top Up 36,824.58 USDC 📍➤ graph.org/Transfer-04-13-6?hs=d04148934f687c9ddf64935186d360ae& 💰 15-04-2026 20:57:43

l24nby


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती