Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 स्पेशल स्टोरी

महाराष्ट्रात सुमारे 44 हजार कोटींची गुंतवणूक; 7 हजारांपेक्षा अधिक रोजगार निर्मिती होण्याची देखील शक्यता!

xtreme2day   12-03-2026 21:47:19   17329875

महाराष्ट्रात सुमारे 44 हजार कोटींची गुंतवणूक; 7 हजारांपेक्षा अधिक रोजगार निर्मिती होण्याची देखील शक्यता!

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - राज्य सरकारच्या उद्योग विभागाने 8 कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले आहेत. या करारांमुळे महाराष्ट्रात सुमारे 44 हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. एवढंच नव्हे तर या माध्यमातून 7 हजारांपेक्षा अधिक रोजगार निर्मिती होण्याची देखील शक्यता आहे. यामध्ये एरोस्पेस, डेटा सेंटर, स्टील, ग्रीन इनिशिएटिव्ह, हायड्रोजन व नैसर्गिक वायू साठवण प्रणाली, फायबर उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक करण्यात येणार आहे.

 

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत विधानभवनात उद्योग विभागाच्या वतीने बुधवारी आठ कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांस या आठ कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस हे स्वित्झर्लंडमधील दावोस येथे जानेवारी 2025 आणि 2026 मध्ये झालेल्या जागतिक आर्थिक परिषद मध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते. जगभरातील मोठ्या कंपन्यांशी बैठक घेणे आणि महाराष्ट्रात उद्योग उभारण्यासाठी सामंजस्य करार करणे आणि डेटा सेंटर, ऑटोमोबाईल, सेमिकंडक्टर, ईव्ही, इलेक्ट्रॉनिक्स, औषधनिर्मिती, संरक्षण व एरोस्पेस, पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रातील गुंतवणूक करारांवर आता प्रत्यक्ष कृतीला सुरूवात झाली आहे.

 

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आठ कंपन्यांसोबत सामंजस्य करार केल्यामुळे महाराष्ट्रात एकूण 44 हजार 710 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. तसेच या कराराच्या माध्यमातून सुमारे 7 हजार 030 रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने गुंतवणूकदारांसाठी आवश्यक यंत्रणा उभी केली आहे. शासन आणि उद्योगक्षेत्र एकत्रितपणे प्रगती करू शकतो, असा महाराष्ट्राचा सिद्ध झालेला अनुभव आहे. त्यामुळे प्रशासकीय बाबींमध्ये काही अडचण आल्यास शासन त्यांना सर्वतोपरी मदत करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. एरोस्पेस, डेटा सेंटर, स्टील, ग्रीन इनिशिएटिव्ह, हायड्रोजन व नैसर्गिक वायू सा आहेठवण प्रणाली, फायबर उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पांमुळे नांदेड, नाशिक, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, अहिल्यानगर आणि अमरावती या भागांमध्ये औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती