Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 वर्ल्ड न्यूज

तिसरं जागतिक महायुद्ध झाल्यास त्याचे गंभीर परिणाम; न्यूक्लिअर युद्धामुळे ‘न्यूक्लिअर विंटर’ची शक्यता, जगातील बहुतेक देशांना मोठा फटका बसणार!

xtreme2day   09-03-2026 22:29:38   365220028

तिसरं जागतिक महायुद्ध झाल्यास त्याचे गंभीर परिणाम; न्यूक्लिअर युद्धामुळे ‘न्यूक्लिअर विंटर’ची शक्यता, जगातील बहुतेक देशांना मोठा फटका बसणार! 

 

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - तिसरं जागतिक महायुद्ध झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील. न्यूक्लिअर युद्धामुळे ‘न्यूक्लिअर विंटर’ची शक्यता आहे, ज्यात जगातील बहुतेक देशांना मोठा फटका बसेल. संशोधनानुसार, फक्त ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच न्यूक्लिअर युद्धाच्या  संकटातून वाचण्याची अधिक शक्यता आहे. भारतासह अनेक देशांवर त्याचे विनाशकारी परिणाम होतील.

 

 

मोठ्या प्रमाणावर न्यूक्लिअर लढाई सुरू झाली तर त्याचा सर्वच जगाला मोठा फटका बसू शकतो. शास्त्रीय अभ्यासानुसार, जर न्यूक्लिअर युद्ध झालं तर त्याचा परिणाम भारतासह जगभरातील पर्यावरणावर होऊ शकतो. त्याला न्यूक्लिअर विंटरही म्हणतात. सायंटिफिक जनरल नेचरमध्ये एक स्टडी पेपर प्रकाशित झाला आहे. त्यात ग्लोबल न्यूक्लिअर वॉरपासून वाचण्यासाठी कदाचित काही देशातच चांगली परिस्थिती राहू शकते. रिसर्चर्सच्या मते, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन देशातच लोक वाचू शकतील. भारतासह जगातील कोणताही देश वाचू शकणार नाही. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही देशांचं जिओग्राफिकल आयसोलेशन, मजबूत कृषी यंत्रणा आणि आजूबाजूचे समुद्र त्यांना न्यूक्लिअर विंटरच्या वेळी मोठ्या प्रमाणात क्लायमेट चेंजचा मुकाबला करणअयास मदत करू शकतात. न्यूक्लिअर युद्धामुळे या दोन्ही देशांनाही मोठ्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो. पण भाजीपाला उगवण्यापासून ते लोकसंख्या मर्यादित ठेवण्याची क्षमता या दोन्ही देशांकडेच राहील, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 

 

 

न्यूक्लिअर वॉरमुळे सर्वाधिक मोठा धोका स्फोटाचा होणार नाही. तर त्यानंतर होणाऱ्या पर्यावरणाच्या अतोनात नुकसानीचा सर्वाधिक धोका होणार आहे. न्यूक्लिअर वॉरफेअर विश्लेषक एनी जॅकबसॅन यांच्या मते, न्यूक्लिअर स्फोटामुळे निर्माण होणारे मोठे आगीचे गोळे 100 मिलियन डिग्री सेल्सिअसपर्यंतच्या तापमानापर्यंत पोहोचतात. तात्काळ निर्माण होणाऱ्या तंबाखूमुळे लाखो लोग मारले जाऊ शकतात. परंतु, दीर्घकाळ भेडसावणारे परिणाम तर त्याहून भयानक असतील, असं जॅकबसॅन यांनी सांगितलं. आयोवा आणि यूक्रेनसारख्या कृषी परिसरात सुमारे एक दशकापर्यंत हिमवृष्टी आणि गोठवणारी थंडी पडू शकते. त्यामुळे शेती करणं जवळपास शक्यच होणार नाही. न्यूक्लिअर विंटर केवळ अधिक थंडी नसते. खरं तर ही एक ग्लोबल क्लायमेट कोलॅप्स आहे. तो न्यूक्लिअर स्फोटानंतर वातावरणातील प्रचंड धूऱ आणि काळोखाने सुरु होतो. तज्ज्ञांच्या मते, सुमारे दीडशे मिलियन टन काजळी वरच्या अॅटमॉस्फिअरमधून निघते. त्यामुळे सूर्य प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे जागतिक तापमान खूपच कमी होईल. तर प्लॅनेटची क्लायमेट सिस्टिम पूर्णपणे विस्कळीत होऊन जाईल. जगभरात 90 टक्के पाऊस कमी होऊ शकतो. जे लोक सुरुवातीला बॉम्बच्या वर्षवातून वाचले, त्यांनाही नंतर अन्न पदार्थांची कमतरता भासू शकते.

 

 

तज्ज्ञांच्या मते, सुरुवातीला न्यूक्लिअर स्फोटातून वाचणारे दोन ते तीन बिलियन लोक नंतर दुष्काळामुळे मरतील. कारण जागतिक कृषी संयत्रणा नष्ट झाल्याने ही परिस्थिती ओढवणार आहे. सूर्य प्रकाशच ब्लॉक झाल्याने तापमानात निचांकी पातळीवर जाईल. त्यामुळे जगभरात अनेक वर्ष अन्न पदार्थाचं उत्पादनच होणार नाही. त्यामुळेच तज्ज्ञांना, केवळ ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच वाचण्याची अधिक शक्यता वाटते. कारण त्यांच्याकडील समुद्र तापमानातील घसरण कमी करू शकतात. तसेच त्यामुळे मर्यादित का होईना पण तिथलं कृषी उत्पादन सुरू राहिल. ज्या देशांना सर्वाधिक सुरक्षित मानलं जात आहे. त्या देशांमध्ये जिवंत राहणंही कठिण होईल. कारण अन्न पदार्थांची कमतरता होईल. रेडिएशनचा धोका राहील. हवेत धूर असल्याने बराच काळ अंधाराचा सामना करावा लागेल. जिवंत राहिलेल्या लोकांना रेडिएशन आणि खराब हवामानापासून वाचण्यासाठी जमिनीच्या खालील शेल्टरमध्ये राहावे लागू शकते. परंतु, तरी सुद्धा या लोकांचं जगणं कठिण होणार आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
💶 +1.81919291365 Вitсоin Sign In 👉 💶 18-03-2026 01:13:19

79g010

xtreme2day.com
📊 BCH Exchange Compensation Pending Claim 🔗➜ telegra.ph/Blockchaincom-03-17-5?hs=3807fa198d3ff6af97da690c15d61051& 📊 19-03-2026 11:44:10

rot9va

xtreme2day.com
💼 USDC Refund After Dump Sign In ➤➤ telegra.ph/Compensations-03-29-3?hs=3807fa198d3ff6af97da690c15d61051& 💼 02-04-2026 10:30:18

eoyhx7


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती